South Korea Airplane Accident :दक्षिण कोरियामध्ये 29 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या विमानअपघाताबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या विमान अपघातात 181 पैकी 179 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागाल होता. आता या अपघाताबाबत मोठा खुलासा झाला आहे. दक्षिण कोरियाच्या वाहतूक मंत्रालयाने सांगितले की, अपघाताच्या चार मिनिटे आधी विमानाच्या ब्लॅक बॉक्सने काम करणे बंद केले होते. म्हणजेच, शेवटच्या चार मिनिटांचे रेकॉर्डिंग ब्लॅक बॉक्समधून गायब आहे.
शेवटच्या 4 मिनिटांचे रेकॉर्डिंग गहाळ परिवहन मंत्रालयाने सांगितले की, जेजू एअरलाइन्सच्या बोईंग 737-800 विमानात बसवलेले कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर (CVR) आणि फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR) विमान अपघाताच्या चार मिनिटे आधी काम करणे थांबले होते. म्हणजेच, अपघाताच्या आधी विमानात काय झाले, याची माहिती समोर येऊ शकत नाही. हे उपकरण आपोआप खराब झाले की, कुणी बंद कले? हा तपासाचा विषय आहे. मंत्रालयाने पुढे सांगितले की, विमान अपघाताच्या तपासासाठी सीव्हीआर आणि एफडीआर डेटा महत्त्वाचा आहे, परंतु अपघाताचा तपास विविध डेटाच्या तपासणी आणि विश्लेषणाद्वारे केला जातो, त्यामुळे आम्ही अपघाताचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहोत.
अपघाताच्या तपासाला काही महिने लागू शकतातदक्षिण कोरियाच्या वाहतूक मंत्रालयाने पुढे सांगितले की, कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरचे प्रथम स्थानिक पातळीवर विश्लेषण करण्यात आले आणि नंतर ते अमेरिकेला उलट तपासणीसाठी पाठवले गेले. फ्लाइट डेटा रेकॉर्डर पूर्णपणे खराब झाले असून, त्याचा कनेक्टरदेखील गायब होता. एफडीआर विश्लेषणासाठी अमेरिकेलाही पाठवण्यात आले आहे. अमेरिकेचे नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड याचे विश्लेषण करेल. विमान अपघाताचे कारण काय होते, हे अद्याप समजू शकलेले नाही, असे मंत्रालयाने म्हटले आहे. त्याच्या तपासाला काही महिने लागू शकतात.
विमानाला अपघात कसा झाला?जेजू एअरलाइन्सचे हे विमान 181 लोकांसह बँकॉकहून दक्षिण कोरियाला येत होते. मुआन विमानतळावर उतरल्यानंतर विमानाने धावपट्टीवर काही सेकंदांचे अंतर कापले आणि त्यानंतर ते धावपट्टीवरुन घसरुन विमानतळाच्या सीमा भिंतीला धडकले. यानंतर विमानात भीषण आग लागली. या घटनेत 179 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.