सियोल : दक्षिण कोरियामध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे मृतांची संख्या ३९ वर पोहोचली आहे. दरम्यान, अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीला तोंड देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आदेश राष्ट्रपती यून सुक येओल यांनी सोमवारी जारी केले आहेत.
बचाव कार्यादरम्यान जवळपास १२ हून अधिक लोक बुडलेल्या अवस्थेत सापडले आहेत. गृहमंत्रालयानेही नऊ जण बेपत्ता आणि ३४ जण जखमी झाल्याची माहिती दिली आहे. दरम्यान, १३ जुलैपासून देशाच्या मध्य आणि दक्षिण भागात मुसळधार पाऊस पडत आहे.
राष्ट्रपतींनी बोलविली इंट्रा-एजन्सी बैठकमध्यवर्ती शहरातील चेओंगजूमध्ये एका बोगद्यात १२ जणांचा मृत्यू झाला, जेथे जवळच्या नदीचा बांध कोसळल्यानंतर शनिवारी अचानक आलेल्या पुरात बससह सुमारे १६ वाहने वाहून गेली. इतर नऊ जण जखमी झाले आहेत. दरम्यान, राष्ट्रपती यून सुक येओल यांनी आपत्तीबाबत इंट्रा-एजन्सी बैठक बोलावली आणि अधिका-यांना पीडितांना वाचवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
७००० हून अधिक लोकांना घरे रिकामी करण्याचे आदेश मुसळधार पावसामुळे आतापर्यंत देशभरातील ७००० हून अधिक लोकांना घरे रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शनिवारपर्यंत, संततधार पावसामुळे धरण ओसंडून वाहून गेल्याने गोसेन काउंटीमधील ६४०० रहिवाशांना क्षेत्र सोडण्यास सांगण्यात आले, अशी माहिती एएफपी वृत्तसंस्थेने दिली आहे.