न्यूयॉर्क : ब्रिटन आणि अमेरिका यांनी आरोप केला आहे की, रशियाने अंतराळात एक सॅटेलाईट शस्त्रासारखी वस्तू तयार केली आहे. ब्रिटनच्या अंतराळ संचालनालयाचे प्रमुख एअरव्हाईस मार्शल हार्वे स्मिथ यांनी म्हटले आहे की, अशा प्रकारची कृती अंतराळातील शांततेचा भंग करते. पूर्ण अंतराळात नुकसान होऊ शकते.
हार्वे स्मिथ यांनी म्हटले आहे की, रशियाने शस्त्रासारखी एक वस्तू तयार करून आपले एक सॅटेलाईट टेस्ट केले आहे. यामुळे आम्ही काळजीत आहोत. रशियाच्या या सॅटेलाईटबाबत अमेरिकेने यापूर्वीच चिंता व्यक्त केलेली आहे. आम्ही रशियाला असा आग्रह करतो की, त्यांनी यापुढे अशी चाचणी करू नये. ब्रिटनच्या इंटेलिजन्स आणि सुरक्षा समितीने एका अहवालात म्हटले आहे की, ब्रिटनचे सरकार रशियाचा धोका ओळखण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे.
नवी स्पर्धा सुरू होण्याची शक्यता
या घटनेने अंतराळात शस्त्रास्त्राची नवी स्पर्धा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अन्य देशही अशी चाचणी करू शकतात.2018 मध्येच अमेरिकेने याबाबत काळजी व्यक्त केली होती. अमेरिकेच्या स्पेस कमांडचे प्रमुख जनरल जे. रेमंड यांनी म्हटले आहे की, रशियाने अंतराळात एक सॅटेलाईट विरोधी हत्यार टेस्ट केले आहे, याचे पुरावे आहेत.