लोकमत न्यूज नेटवर्ककोरोनाच्या संकटातून कसं बाहेर पडायचं, हेच अजूनही अनेक देशांना कळलेलं नाही. इटली, स्पेन, अमेरिका इत्यादि देशांमध्ये तर कोरोनानं इतका हैदोस घातला की त्याला प्रतिकार करणार्या सर्व यंत्रणा जवळपास निकामी झाल्या किंवा त्यांना अतिरिक्त क्षमतेनं काम करावं लागतंय. तरीही कोरोना आटोक्यात येण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही. त्यामुळेच अनेक देश आता अक्षरश: घाबरले आहेत. पोलीस आणि आरोग्य व्यवस्थेतील लोकांकडून किती काम करवून घ्यायचं, त्यांना दिवसाचे किती तास दावणीला बांधून ठेवायचं, आणि त्यांचे जीव किती धोक्यात घालायचे यालाही र्मयादा आहेत. ही झाली प्रशासनातली प्रमुख ‘कार्यकर्त्यांची’ कहाणी, पण सर्वसामान्य माणसांचे काय?आपल्या आयुष्याचाच भरवसा अनेक देशांतील नागरिकांना आता वाटत नाहीए. त्यावर उपाय शोधण्याचे प्रय} वैयक्तिक आणि सरकारी पातळीवर सुरू आहेत, पण हे कोणतेही प्रयत्न पुरे पडणारे नाहीत. अनेक प्रगत देशांतही अनेक नागरिकांवर भूकबळी होण्याची वेळ आली आहे. प्रत्येक जण आहे ते टिकवून ठेवण्याचा आणि समजा एक पोळी असेल तर त्यातलीही चतकोरच खाऊन पाऊण पोळी येणार्या दिवसांसाठी राखून ठेवण्याचा प्रय} करतो आहे. स्पेनमध्येही हीच परिस्थिती आहे. हजारो लोकांना कोरोनाबरोबरच आपल्या भुकेचीही चिंता आहे. या दोघांपैकी कोणीतरी आपल्याला मारेलच, या भीतीची काजळी त्यांच्या डोक्यावर धरलेली आहे. सरकारनंही त्यासाठी गांभीर्यानं प्रय} सुरू केले आहेत. लोकांना किमान जिवंत राहण्याइतकं तरी अन्न मिळावं, त्यासाठीचा पैसा त्यांना मिळावा यासाठी त्यांनी प्रय} सुरू केले आहेत.स्पेनमध्ये विविध पक्ष एकत्र येऊन तयार झालेलं युतीचं सरकार आहे. पण आता त्यांच्यातही याबाबत एकमत झालं असून लोकांना ‘टार्गेटेड बेसिक इनकम’ देण्यात येणार आहे. आत्ताच्या घडीला जगण्यासाठी प्रत्येकाला किमान किती उत्पन्नाची गरज आहे, याचा विचार करून ही रक्कम ठरवण्यात आली आहे. यासंदर्भात डाव्या पक्षांचे सेक्रेटरी जनरल पाब्लो इग्लेसियास यांनी आपल्या ट्विटर हॅँडलवरुन नुकतेच निवेदन दिले आहे की, ‘बेसिक इनकम’ हे केवळ तुमच्या सामाजिक न्यायाच्या मोजमापाचे मापदंड नसते, तर तुमच्या आर्थिक कार्यक्षमतेचेही ते प्रतीक असते. आम्हाला आनंद आहे, की आमच्या युती सरकारमधील सर्वांमध्ये आता सहमती झाली असून येत्या मे महिन्यापासून आम्ही लोकांना ‘मिनिमम बेसिक इनकम’ देऊ शकू!स्पेनमध्ये सध्याच्या घडीला अशी हजारो कुटुंबं आहेत, ज्यांना आजच्या जेवणाचीच भ्रांत पडली आहे. आणखी जास्त काळ ते तग धरू शकणार नाहीत. सरकारनंही मग यासाठी शक्य त्या सार्या उपाययोजना करताना निदान मे महिन्यापासून तरी लोकांना किमान रक्कम मिळेल अशी तजवीज केली आहे.
स्पेनमध्ये लोकांना मिळणार ‘बेसिक इनकम’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 8:47 PM
स्पेनमध्ये विविध पक्ष एकत्र येऊन तयार झालेलं युतीचं सरकार आहे. पण आता त्यांच्यातही याबाबत एकमत झालं असून लोकांना ‘टार्गेटेड बेसिक इनकम’ देण्यात येणार आहे. आत्ताच्या घडीला जगण्यासाठी प्रत्येकाला किमान किती उत्पन्नाची गरज आहे, याचा विचार करून ही रक्कम ठरवण्यात आली आहे.
ठळक मुद्देस्पेनमध्ये लोकांना जगण्याला मिळाला आधार!