बार्सिलोना, दि. 18 - स्पेनच्या बार्सिलोना शहरातील रॅमब्लास येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर कॅम्ब्रिल्स येथेही व्हॅन गर्दीत घुसवून दहशतवादी हल्ल्याचा दुसरा प्रयत्न झाला. पण सर्तक असलेल्या पोलिसांनी वेळीच या हल्ल्याचा प्रयत्न उधळून लावला. यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात पाच दहशतवादी ठार झाले.
दुस-या हल्ल्यात सहा नागरीक आणि एक पोलिस अधिकारी जखमी झाला आहे. व्हॅनमधील पाचव्या हल्लेखोराला जखमी झाल्यानंतर ताब्यात घेण्यात आले होते पण त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असे स्पॅनिश पोलिसांनी सांगितले. कॅमब्रिल्स येथे गर्दीत गाडी घुसवणा-या हल्लेखोरांनी अंगाला स्फोटकांनी भरलेला पट्टा बांधला होता. रॅमब्लास सारखी इथेही हल्लेखोरांनी गर्दीत गाडी घुसवली असे कॅटालान इर्मजन्सी सर्व्हिसेसकडून सांगण्यात आले.
आणखी वाचा स्पेनमध्ये दहशतवादी हल्ल्यात 13 जणांचा मृत्यू, इसिसनं स्वीकारली जबाबदारीअमरनाथ दहशतवादी हल्ला निंदनीय - अमेरिका
फ्रान्समध्ये दहशतवादी हल्ल्यात ८४ नागरिक ठारस्वीडनमध्ये ट्रकहल्ला, तीन ठार, एक संशयित अटकेत
स्पॅनिश मीडियाने दिलेल्या माहितीनुसार कॅम्ब्रिल्समध्ये हल्लेखोरांची गाडी पलटी झाली. गाडी पलटी झाल्यानंतर हल्लेखोर त्यातून उतरतानच पोलिसांनी त्यांना लक्ष्य केले. त्यात पाच दहशतवादी ठार झाले. कॅम्ब्रिल्स हे किनारपट्टीवर वसलेले शहर असून, बार्सिलोनापासून 120 किलोमीटर अंतरावर आहे.
दहशतवाद्यांनी रॅमब्लास येथे पहिला हल्ला केला. त्यांनी गर्दीत गाडी घुसवून अनेकांना चिरडले. त्यानंतर अंदाधुंद गोळीबार केला. यात 13 जणांचा मृत्यू झाला असून, 100हून अधिक लोक जखमी आहेत. वाहनाच्या धडकेत अनेक जण गंभीररीत्या जखमी झाल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. स्पेन पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली आहे. इसिस या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे.
तर दहशतवादाविरोधात आम्ही स्पेनसोबत असल्याचं विधान इंग्लंडच्या पंतप्रधान टेरेसा मे यांनी केलं आहे. स्पेनमध्ये दुसरा होणारा संभावित हल्ला रोखण्यासाठी कॅम्ब्रिल्समध्ये पोलिसांनी गोळीबार केला. कॅम्ब्रिल्स बंदराजवळ पोलिसांना गोळीबाराचा आवाज आला. त्यानंतर पोलिसांनी लोकांना रस्त्यावर न उतरण्याचा इशारा दिला. स्पेनचे पंतप्रधान मारियानो रखॉय यांनी 'जिहादी हल्ला' असा करार दिला आहे. तत्पूर्वी युरोपिय देशात अनेकदा अशा प्रकारचे दहशतवादी हल्ले झालेत. फ्रान्स, बेल्जियम आणि जर्मनी हे देश अशा हल्ल्यांनी हादरले आहेत. स्पेनच्या राजघराण्यानं या दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. देश अतिरेक्यांच्या दहशतवादापुढे कधीही झुकणार नाही, असं विधान स्पेनच्या राजघराण्यानं केलं आहे.