वॉशिंग्टन : कोरोना विषाणूचा कहर अवघ्या जगभरात पसरलेला असताना आता तज्ज्ञांनी अजब दावा केला आहे. कोरोना लसीकरण जगातील बहुतांश देशात सुरू करण्यात आले आहे. ज्या पद्धतीने हे लसीकरण सुरू आहे, त्यावरून तज्ज्ञांनी हा अंदाज वर्तवल्याचे सांगितले जात आहे. (Seven Years to End Corona Virus Pandemic)
ब्लूमबर्ग व्हॅक्सिनेशन कॅलक्युलेटरनुसार डॉ. अँथनी फाउची यांनी जगभरातील ७५ टक्के नागरिकांनी हर्ड इम्यूनिटी समान पातळीवर येण्यासाठी बराच मोठा कालावधी जाईल, असे सांगत कोरोनाचा कहर शमण्यासाठी सात वर्षे लागू शकतात, असा दावा केला आहे.
आनंदाची बातमी! न्यायदानात महाराष्ट्र पुन्हा नंबर वन; उत्तर प्रदेश सर्वांत पिछाडीवर
दररोज किती जणांना कोरोना लस?
जागतिक स्तराचा आढावा घेतल्यास दररोज सुमारे ४० लाख जणांना कोरोनाची लस देण्यात येत आहे. अमेरिकेत एकूण जनसंख्येच्या केवळ ८.७ टक्के नागरिकांना कोरोना लस देण्यात आली आहे. अमेरिकेत दररोज सुमारे १३ लाख नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येते. मात्र, यात दररोज वाढ होताना दिसत आहे, असे सांगितले जात आहे.
इस्राइलमध्ये सर्वाधिक कोरोना लसीकरण!
इस्राइल हा देश जागतिक पातळीवर कोरोना लसीकरणामध्ये आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. इस्राइलमध्ये एकूण जनसंख्येच्या ५८.५ टक्के नागरिकांना कोरोना लस देण्यात आली आहे. इस्राइल आगामी दोन महिन्यात हर्ड इम्युनिटी पातळी गाठू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. याशिवाय आफ्रिका खंडाच्या पूर्वेला असलेल्या सेशेल्स देश कोरोना लसीकरणाच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. सेशेल्समध्ये आतापर्यंत ३८.६ टक्के नागरिकांना कोरोना लस देण्यात आली आहे.
कोरोना लसीकरणात अमेरिका कुठे?
कोरोना लसीकरणाच्या बाबतीत अमेरिका सहाव्या स्थानावर आहे. अमेरिका २०२२ पर्यंत हर्ड इम्युनिटी पातळी गाठू शकतो, असे सांगितले जात आहे. संयुक्त अरब आमिराती, युनायडेट किंगडम आणि बहरीन या देशामध्ये त्या त्या देशातील एकूण जनसंख्येच्या ११.८ टक्के कोरोना लसीकरण झाले आहे. दरम्यान, ब्रिटननंतर दक्षिण आफ्रिका आणि ब्राझील या देशांमध्ये कोरोनाचा नवा प्रकार समोर आल्यानंतर कोरोनाची स्थिती अद्याप गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.