ऑनलाइन लोकमतन्यू यॉर्क, दि. 20 - सात मुस्लिम देशांतील नागरिकांवर अमेरिकेच्या प्रशासनानं घातलेल्या प्रवेशबंदीच्या निर्णयाच्या निषेधार्थ आज न्यू यॉर्कमधल्या टाइम्स स्क्वेअर इमारतीजवळ दहा हजारोंच्या संख्येनी लोकांनी रॅली काढली आहे. यावेळी रॅलीमध्ये सहभागी झालेल्या अमेरिकन नागरिकांनी एका गाण्याच्या माध्यमातून मुस्लिमांच्या सोबत असल्याचा संदेशही दिला आहे. या रॅलीत अमेरिकेतील काही अभिनेते, दिग्दर्शक, व्यावसायिक, राजकारण्यांनीही सहभाग नोंदवला आहे. रसेल सिमॉन्स आणि सुसन सॅरांडोन यांनीही या रॅलीत सहभागी होत ट्रम्प यांच्या मुस्लिम प्रवेश बंदीचा निषेध नोंदवला आहे. देशातील मुस्लिम भयभीत झाले असल्याने त्यांच्या विषयी सद्भावना व्यक्त करण्यासाठीच या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं, असंही रॅलीच्या आयोजकांनी सांगितलं आहे.
Hearing that there were between 7,000-10,000 people who came to the #IAmAMuslimToo rally today!! An absolute incredible show of solidarity! pic.twitter.com/gAFOrx6JFG— Russell Simmons (@UncleRUSH) February 19, 2017
मुस्लिमांवरील बंदी हटवा, आम्हीही मुस्लिम आहोत असे समजा, ट्रम्प यांचा आम्ही द्वेष करतो, असे फलक आंदोलनकर्त्यांनी झळकावले आहेत. यात न्यूयॉकचे महापौर बिल डे ब्लासिओ हेही सहभागी झाले.
"Regardless of your background, your faith or where you were born, this is your city." - @NYCMayor#IAmAMuslimToopic.twitter.com/XU6vnBmlt5— I Am A Muslim Too (@iamamuslimtoo) February 19, 2017
ते म्हणाले, सर्वधर्माचा आदर करण्यासाठी अमेरिकेची स्थापना झालीय. अमेरिकेतील नागरिक मुस्लिमांच्या विरोधात आहेत अशी जी जनभावना निर्माण केली जात आहे ती पुसून टाकण्याची गरज आहे. न्यू यॉर्क शहराचा प्रमुख या नात्याने सर्वांना एक संदेश देऊ इच्छितो की, तुम्ही कोणत्याही धर्माचे, वंशाचे किंवा तुमचा जन्म कोठेही झालेला असला तरी हा देश कायम तुमचा आहे आणि तुमचाच राहील. एखाद्या विशिष्ट धर्मावर हल्ला करणे म्हणजे सर्वच धर्मावरील हल्ला समजला गेला पाहिजे, असे ते म्हणाले. जगातील 160 कोटी मुस्लिम शांतताप्रिय आहेत. मी स्वतःलाही अभिमानाने मुस्लिमच समजतो, अशीही भावना बिल डे ब्लासिओ यांनी व्यक्त केली आहे.
Thank you to all who organized #IAmAMuslimToo today - Charlotte's 1st protest rally. #NoBanNoWallNoRaidspic.twitter.com/5mSXGQtPJU— Chelsea Clinton (@ChelseaClinton) February 19, 2017
.@SusanSarandon and @lsarsour at the #IAmAMuslimToo rally in Times Square. Solidarity! #HeretoStay#NoBanNoWall#SundayMorningpic.twitter.com/6rsCuoxQhI— RoseAnn DeMoro (@RoseAnnDeMoro) February 19, 2017
.@lsarsour is unapologetically Muslim. We are so honored to stand with her today. #IAmAMuslimToopic.twitter.com/7pNvUU2evg— I Am A Muslim Too (@iamamuslimtoo) February 19, 2017