शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
3
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
4
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
5
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
6
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
7
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
8
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
9
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा
10
PAN कार्डासाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल? अवघ्या काही दिवसांत घरपोच मिळेल
11
दिल्लीतील सहा मंदिरांवर वक्फ बोर्डाने ठोकला दावा, अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालातून समोर आली माहिती  
12
कसे तयार केले जातात तिरुपतीचे लाडू? 300 वर्षांत 6 वेळा बदलली रेसिपी, वर्षाला होते 500 कोटींची कमाई!
13
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
14
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
15
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
16
कोण आहेत न्यायाधीश श्रीशानंद? ज्यांनी मुस्लीम परिसराचा उल्लेख केला पाकिस्तान
17
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
18
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
19
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
20
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!

Sri Lanka crisis: श्रीलंकेतील आणीबाणी उठविली, राजपक्षे यांचा राजीनामा देण्यास नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2022 8:02 AM

Sri Lanka crisis: आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेमध्ये लागू केलेली आणीबाणी राष्ट्राध्यक्ष गोटबाया राजपक्षे यांनी मंगळवारी रात्रीपासून तातडीने उठविली. राजपक्षे यांचे सरकार अल्पमतात आले असूनही ते राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा देणार नाहीत, हेही स्पष्ट झाले आहे.

कोलंबो : आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेमध्ये लागू केलेली आणीबाणी राष्ट्राध्यक्ष गोटबाया राजपक्षे यांनी मंगळवारी रात्रीपासून तातडीने उठविली. राजपक्षे यांचे सरकार अल्पमतात आले असूनही ते राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा देणार नाहीत, हेही स्पष्ट झाले आहे.

राजपक्षे घराणे व त्यांच्या कारभाराबद्दल श्रीलंकेतील जनतेत प्रचंड असंतोष आहे. २२५ सदस्य असलेल्या श्रीलंका संसदेतील ४१ सदस्यांनी मंगळवारी स्वत:ला अपक्ष म्हणून जाहीर केले होते. त्यांच्या पाठिंब्याअभावी सत्ताधारी आघाडी अल्पमतात आली. त्या देशाचे महामार्ग खात्याचे मंत्री जॉन्स्टन फर्नांडो यांनी संसदेत सांगितले की, निवडणुकीत ६९ लाख लोकांनी केलेल्या मतदानामुळे राजपक्षे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. त्यामुळे कोणत्याही स्थितीत ते राजीनामा देणार नाहीत. 

देश आर्थिक संकटात सापडल्यामुळे राजपक्षे यांच्याविरोधात विरोधक व जनतेेने जोरदार निदर्शने सुरू केली. या हिंसाचाराच्या मागे जनता विमुक्ती पेरामुनावास ही विरोधकांची आघाडी आहे, असा आरोप करून राजपक्षे सरकारने आणीबाणीचे समर्थनच केले. विरोधकांच्या गुंडगिरीच्या राजकारणाला जनतेेने वाव देऊ नये व सध्या सुरू असलेला हिंसाचार थांबवावा, असे आवाहन राजपक्षे सरकारने केले आहे. (वृत्तसंस्था)

बँकांची पुनर्रचना करण्याची कर्मचारी संघटनेची मागणीश्रीलंकेतील बँकांची पुनर्रचना करण्यात यावी, अशी मागणी बँक ऑफ सिलोनच्या कर्मचारी संघटनेने केली आहे. बँक कर्मचारीही राजपक्षे सरकारविरोधातील निदर्शनांमध्ये उतरले आहेत. संसद बरखास्त करून निवडणुका घ्या, अशीही मागणी या कर्मचाऱ्यांनी सरकारकडे केली आहे. 

नन्स, डॉक्टरही सरकारविरोधातदेशभरातील डॉक्टर व कॅथॉलिक नन्सही राजपक्षे सरकारविरोधात निदर्शनात सहभागी झाल्या आहेत. जनतेला चांगले आयुष्य जगण्याचा अधिकार असून, तो हक्क अबाधित राहिला पाहिजे, असे डॉक्टरांच्या संघटनेने म्हटले आहे. 

शेअर बाजाराच्या निर्देशांकात घसरणअस्थिर राजकीय वातावरणामुळे श्रीलंकेच्या शेअर बाजाराचा निर्देशांक बुधवारी दोन टक्क्यांनी घसरला. राजपक्षे यांनी आणीबाणी उठवूनदेखील त्या देशातील शेअर बाजार अद्याप सावरू शकला नाही. 

टॅग्स :Sri Lankaश्रीलंकाPoliticsराजकारणEconomyअर्थव्यवस्था