Sri Lanka Crisis : श्रीलंकेवरी आर्थिक संकट अधिक मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. आंदोलकांकडून होणारा विरोध दाबण्यासाठी मंगळवारी पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात फौजफाट्याची मदत घेण्यात आली. यादरम्यान पोलिसांकडून गोळ्या चालवण्यात आल्या. त्यात एकाचा मृत्यू झाला, तर दहा जण जखमी झाली. यानंतर रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
आपल्या चुकीच्या निर्णयांमुळे देश मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटाचा सामना करत आहे, याची कबुली श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी दिली होती. तसंच त्यांनी सर्वकाही ठीक करण्याचं आश्वासनही दिलं. “गेल्या अडीच वर्षांमध्ये आम्हाला अनेक मोठ्या समस्यांचा सामना करावा लागला. कोरोना महासाथीसोबतच कर्जाचं ओझं आणि आमच्या काही चुका… त्यांना आता सुधारण्याची गरज आहे. त्या सुधारून आपल्याला पुढे जावं लागेल. लोकांचा विश्वास पुन्हा मिळवावा लागेल,” असं राजपक्षे म्हणाले होते.
या चुकांचा उल्लेखकर्जाचा बोजा वाढल्यानंतर आपण त्वरित आयएमएफकडे संपर्क साधायला हवा होता. यासोबतच देशात केमिकल फर्टिलायझरवर निर्बंधही घालायला नको होते, असं त्यांनी सांगितलं होतं. श्रीलंकन सरकारनं देशात कृषी क्षेत्र पूर्णपणे ऑर्गेनिक करण्यासाठी केमिकल फर्टिलायझरच्या वापरावर निर्बंध घातले होते.