कोलंबो : श्रीलंकेतील 21 एप्रिलला झालेल्या साखऴी बॉम्बस्फोटांमधील मृतांचा आकडा सरकारने घटविला आहे. आधी हाच आकडा 359 असल्याचे जाहीर केले होते. मात्र, आता या हल्ल्यात 253 जण ठार झाल्याचे श्रीलंका सरकारने जाहीर केले आहे. याचबरोबर पोलिसांनी 4 संशयितांची छायाचित्रे प्रसिद्ध केली असून यामध्ये दोन महिला आहेत. गुरुवारी श्रीलंकेने 39 देशांच्या नागरिकांना व्हिसा ऑन अरायव्हलची सुविधा बंद केली आहे.
कोलंबोवरील हल्ल्यामध्ये नऊ दहशतवादी हे तेथील स्थानिक संघटना नॅशनल तौहीद जमात (एनटीजे) ची असण्याती शक्यता आहे. याच दहशतवाद्यांनी स्फोटके चर्च आणि हॉटेलांमध्ये पोहोचविल्याचा संशय व्यक्त होत आहे.
तसेच या साखळी बॉम्बस्फोटांमागे परदेशी शक्तींचा हात असल्याचे समोर आल्याने व्हिसा ऑन अरायव्हलची सुविधाही त्यांनी रद्द केली आहे. अशा प्रकारची सुविधा 39 देशांना देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, सध्याची हालत पाहता ही सुविधा रद्द करण्यात आली आहे. तपासामध्ये परदेशी शक्तींचे धागेदोरे सापडले आहेत. अशावेळी या सुविधेचा दुरुपयोग होण्याची शक्यता असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
ड्रोन, मानवरहित विमानांवर प्रतिबंधश्रीलंकेत झालेल्या स्फोटानंतर देशात ड्रोन आणि मानवरहित विमानांवर प्रतिबंध आणण्यात आला आहे. नागरी उड्डयन प्राधिकरणाने म्हटले आहे की, हे प्रतिबंध पुढील सूचनेपर्यंत लागू असतील.३९ देशांच्या नागरिकांना श्रीलंकेत आगमनाची सुविधा देणारी आपली योजना श्रीलंकेने गुरुवारी स्थगित केली आहे. पर्यटन मंत्री जॉन अमारातुंगा यांनी सांगितले की, सुरक्षेची परिस्थिती पाहता काही काळासाठी या व्हिसाला स्थगिती देण्यात आली आहे. हल्लेखोरांचा विदेशी संपर्क तपासात दिसून आला असून, या सुविधेचा दुरुपयोग होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
श्रीलंकेच्या संरक्षण सचिवांचा राजीनामाचर्चेस, हॉटेल्स आदी ठिकाणी रविवारी झालेल्या आत्मघाती बाँबहल्ल्यांनंतर श्रीलंकेचे संरक्षण सचिव हेमासिरी फर्नांडो यांनी गुरुवारी पदाचा राजीनामा दिला. पुरेशी आधी गुप्त माहिती असतानाही हे हल्ले रोखण्यात अपयशी ठरल्याबद्दल देशाचे अध्यक्ष मैथ्रीपाला सिरिसेना यांनी फर्नांडो आणि पोलीस महानिरीक्षक पुजिथ जयसुंदरा यांना राजीनामा देण्यास सांगितले होते.