शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

पोपकडून श्रीलंकेतील भारतीयाला संतपद

By admin | Published: January 15, 2015 6:17 AM

श्रीलंकेतील मूळ भारतीय कॅथॉलिक मिशनरी जोसेफ वाझ यांना पोप फ्रान्सिस यांनी आज संतपद जाहीर केले असून, श्रीलंकेतील नागरी युद्धानंतर, १७ व्या शतकातील हे धर्मगुरू राष्ट्रीय एकतेचे शिल्पकार आहेत,

कोलंबो : श्रीलंकेतील मूळ भारतीय कॅथॉलिक मिशनरी जोसेफ वाझ यांना पोप फ्रान्सिस यांनी आज संतपद जाहीर केले असून, श्रीलंकेतील नागरी युद्धानंतर, १७ व्या शतकातील हे धर्मगुरू राष्ट्रीय एकतेचे शिल्पकार आहेत, असा गौरव केला आहे. कोलंबो येथील सागरी किनारी झालेल्या या सोहळ्यास हजारो लोक उपस्थित होते. जोसेफ वाझ यांना संतपद मिळाल्याची घोषणा होताच हजारो लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. गाले समुद्र किनारी घेतलेल्या मोठ्या प्रार्थनेच्या आरंभी पोप फ्रान्सिस यांनी वाझ यांना संतपद दिल्याची घोषणा केली. जोसेफ वाझ यांचा जन्म तत्कालीन पोर्तुगीजांची वसाहत असलेल्या गोव्यात १६५१ साली झाला होता. वाझ हे १६८७ साली ख्रिश्चन भाविकांना एकत्र आणण्यासाठी श्रीलंकेत गेले. पोर्तुगीजांकडून डच वसाहतवाद्यांनी तोपर्यंत श्रीलंकेची किनारपट्टी ताब्यात घेतली होती व कॅथॉलिक भाविकांवर अत्याचार केले जात होते. वाझ यांनी खेड्यातून खेड्यात प्रवास करीत कॅथॉलिक भाविकांना एकत्र केले. १७११ साली त्यांचे निधन झाले, तोपर्यंत त्यांनी ख्रिश्चन बांधवांना एकत्र आणून कॅथालिक चर्चही बांधले होते. (वृत्तसंस्था)