शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
2
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
4
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
5
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
6
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
7
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
8
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
9
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
11
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
12
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
13
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
14
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
15
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
16
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
17
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
18
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
19
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
20
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 

Sri lanka Crisis : महागाईचा आगडोंब! एका महिन्यात श्रीलंका उद्ध्वस्त; तांदूळ 500 रुपये किलो तर सिलिंडर 4,119 रुपये 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 5:17 PM

Sri lanka Crisis : महागाईचा आगडोंब पाहायला आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस खरेदी करण्यासाठी लोकांना मोठमोठ्या रांगा लावाव्या लागत आहेत.

भारताचा शेजारी देश असलेल्या श्रीलंकेत अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. श्रीलंकेच्या करन्सीची व्हॅल्यू ही डॉलरच्या तुलनेत आता जवळपास अर्धी झाली आहे. ज्यामुळे जीवनावश्यक वस्तुंचे भाव गगनाला भिडले आहेत. श्रीलंकेत महागाईचा आगडोंब पाहायला आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस खरेदी करण्यासाठी लोकांना मोठमोठ्या रांगा लावाव्या लागत आहेत. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की एक किलो साखरेसाठी 290 रुपये तर एक किलो तांदूळ घेण्यासाठी  तब्बल 500 रुपये मोजावे लागत आहेत. 

सरकारी आकडेवारीनुसार, श्रीलंकेच महागाईचा दर 17 टक्क्यांहून पुढे गेला आहे. यामुळेच श्रीलंकसमोर आता गंभीर संकट निर्माण झालं आहे. एक कप चहासाठी 100 रुपये द्यावे लागत आहेत. तर ब्रेड, दूध यासारख्या पदार्थांसाठी देखील मोठी किंमत चुकवावी लागत आहे. ब्रेडचं एक पॅकेट 150 रुपयांना तर एक किलो दूध पावडर 1975, एलपीजी सिलिंडर 4119, पेट्रोल 254 तर डिझेल 176 रुपये प्रति लीटर आहे. श्रीलंका सध्या खूप मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. जीवनावश्यक सर्वच सामान हे अत्यंत महाग झालं आहे. जर या किमती अशाच राहिल्या तर उद्या कुटुंबाला काय खायला घालणार याची आता लोकांना खूप भीती वाटू लागली आहे.

गॅसचा तुटवडा असल्याने ब्रेडच्या किमती दुप्पट 

जीवनावश्यक वस्तू, औषधं आणि इंधनासहित अनेक गोष्टी श्रीलंका परदेशातून आयात करू शकत नाही. श्रीलंकेत घरगुती गॅस सिलिंडरचा देखील मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.क ज्यामुळे एक हजार बेकऱ्या या बंद पडल्य़ा आहेत. आठवडाभरपूर्वी इंडस्ट्री असोसिएशनने याबाबत माहिती दिली होती. देशामध्ये इंधनाची कमतरता असल्याने काही ठिकाणी विजेवर चालणारी यंत्रणा बंद करावी लागली आहे. दिवसभरात तब्बल सात तास वीजपुरवठा हा खंडीत केला जातो. एन. के सीलोन बेकरी ओनर्स असोशिएशनचे अध्यक्ष जयवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही शहरी भागांमध्ये गॅसचा तुटवडा असल्याने ब्रेडच्या किमती दुप्पट झाल्या आहे. 

सर्वसामान्यांवर गंभीर परिणाम 

ब्रेडसाठी जवळपास 150 श्रीलंकाई रुपये (0.75 डॉलर) मोजावे लागत आहे. जर एक आठवडा अशीच परिस्थिती राहिली तर 90 टक्के बेकऱ्या बंद कराव्या लागतील. सरकारने तातडीने यावर काहीतरी उपाय काढला पाहिजे. गॅसच्या तुटवड्याचा परिणाम हा अनेक छोट्या रेस्टॉरंट्सवर होत आहे. पण सर्वसामान्य माणसांवर देखील गंभीर परिणाम होत  आहे. श्रीलंकेतील या भीषण परिस्थितीचा फटका हा फक्त गरिबांनाच बसत नाही. तर चांगलं उत्पन्न असणाऱ्या नोकरदारवर्गाला देखील बसत आहे. आपल्या गरजा पूर्ण करणं देखील अत्यंत अवघड झालं आहे. भाज्याच्या किंमती देखील गगनाला भिडल्या आहे. त्यामुळे सर्वसामान्या भाज्या देखील खरेदी करू शकत नाहीत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Sri Lankaश्रीलंकाInflationमहागाई