वॉशिंग्टन : अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात भरावयाच्या न्यायमूर्तींच्या एका जागेसाठी अध्यक्ष बराक ओबामा यांनी तीन नावे निश्चित केली असून त्यात जन्माने भारतीय असलेल्या श्री श्रीनिवासन (४९) यांचा समावेश आहे. श्रीनिवास हे सध्या कोर्ट आॅफ अपिल्स फॉर द डिस्ट्रिक्ट आॅफ कोलंबिया सर्किटमध्ये न्यायमूर्ती आहेत. अन्य दोघांमध्ये न्यायमूर्ती असलेले मेरिक गारलँड आणि कॅलिफोर्नियास्थित कोर्ट आॅफ अपिल्सचे न्यायमूर्ती पॉल वॅटफोर्ड यांचा समावेश आहे. श्रीनिवास यांची नियुक्ती झाली तर ते हे पद भूषविणारे पहिले भारतीय-अमेरिकन व आशियन- अमेरिकन ठरतील.
श्रीनिवासनना सर्वोच्च न्यायालयात संधी?
By admin | Published: March 13, 2016 10:48 PM