मीना : दरवर्षीच्या प्रसिद्ध हज यात्रेला मंगळवारी येथे अत्यंत उत्साहात प्रारंभ झाला. दीड लाखांपेक्षा जास्त भारतीयांचा सहभाग असलेल्या या यात्रेला जगभरातून कित्येक लाख मुस्लिम आले आहेत. मक्का या पवित्र शहरापासून भाविक प्रवासाला प्रारंभ करून या यात्रेतील पहिल्या धार्मिक विधीसाठी जवळच असलेल्या मीना शहरात दाखल झाले.‘लाबैक अल्लाहुमा लाबैक’ (मी येतोय, माझ्या परमेश्वरा, मी येतोय) अशा घोषणा देत भाविक मीना शहराकडे निघाले. त्यांच्या अंगावर पांढरे कपडे होते. काही भाविक चाकांच्या खुर्चीतून मीनाकडे निघाले होते. काही पायी, तर काही सरकारी बसमधून तेथे गेले. भाविक मीना शहरात आल्यावर त्यांच्यापैकी बहुतेकांना भावना अनावर होत होत्या. आनंदाश्रूंनी त्यांचे डोळे वाहत होते व ते हज यात्रा पूर्ण करू शकल्याबद्दल अल्लाहचे आभार मानत होते.भाविक अराफत पर्वताला बुधवारी पोहोचायच्या आधी मीना शहरात संपूर्ण रात्र पवित्र कुराणचे पठण करतील किंवा प्रार्थना म्हणतील. (वृत्तसंस्था)
हज यात्रेस उत्साहात प्रारंभ
By admin | Published: September 22, 2015 10:26 PM