शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार...
2
Satej Patil: सतेज पाटलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; "दुपारी २.३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला"
3
अटकेपार झेंडे फडकावले आमच्या मराठे शाहीने अन् इथे व्यासपीठावर मुली नाचवतायत? राज ठाकरे कुणावर संतापले?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी नॉट रिचेबल नव्हतो, सतेज पाटीलच..."; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर राजेश लाटकरांनी थेटच सांगितलं
5
कोलकाता बलात्कार प्रकरणी ८७ दिवसांनी आरोप निश्चित,दररोज सुनावणी होणार
6
धक्कादायक! मावशी गंगा स्नानाची रील बनवत राहिली अन् 4 वर्षांची चिमुकली बुडत रहिली! 2 तासांनंतर सापडला मृतदेह 
7
...तर रोहित कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होईल, केवळ एकदिवसीय सामने खेळेल; दिग्गज क्रिकेटरची मोठी भविष्यवाणी
8
कॅनडामध्ये हिंदू मंदिरावरावरील हल्ल्याचा मोदींकडून निषेध; 'ट्रुडोंनी कायद्याचे राज्य राखावे अशी अपेक्षा' 
9
AUS vs PAK : "ऑस्ट्रेलियाला नशिबाने साथ दिली...", पाकिस्तानच्या पराभवानंतर कर्णधार रिझवानचं विधान
10
सात राज्यांत कांटे की टक्कर, एकात ट्रम्प आघाडीवर; अमेरिकेच्या मतदानावर जगाच्या नजरा खिळल्या
11
video: लाईव्ह सामन्यादरम्यान कोसळली वीज; एका खेळाडूचा मृत्यू, तर अनेकजण गंभीर जखमी
12
त्याला १२ भाऊ आणि ४ बहिणी आहेत; पाकिस्तानी खेळाडूचा परिचय करुन देताना अक्रम भलतंच बोलला
13
दापोलीत सहा कदम, पर्वतीत तीन अश्विनी कदम! नावं, आडनावं 'सेम टू सेम', कुणाचा होणार 'गेम'
14
उपमुख्यमंत्री बनवून भाजपानं अन्याय केला का?; देवेंद्र फडणवीसांनी आभारच मानले, कारण...
15
राज ठाकरेंचा पहिला घणाघात; पक्ष फोडीवरून एकनाथ शिंदे-अजित पवारांवर बरसले
16
सदा सरवणकरांचा प्रचार करणार की अमित ठाकरेंचा? नारायण राणे म्हणाले...
17
"...तर मीही मुख्यमंत्री व्हायला तयार"; CM महायुतीचाच होणार म्हणत, रामदास आठवले बोलून गेले 'मन की बात'!
18
...तर उद्धव ठाकरे ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री झाले असते; देवेंद्र फडणवीसांनी मांडलं समीकरण
19
सतेज पाटील भडकण्यापूर्वी कोल्हापुरात मोठे नाट्य घडले, शाहू महाराजांनीच मधुरिमाराजेंना सहीचे आदेश दिले
20
Sanjay Roy : "मी निर्दोष आहे, मला फसवण्यात आलं"; आरोपी संजय रॉयने सरकारवर केला गंभीर आरोप

CoronaVirus News: अमेरिकेतील निम्म्या राज्यांकडून निर्बंध शिथिल करण्यास प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2020 4:38 AM

देशातील एकूण राज्यांपैकी निम्म्या राज्यांनी सध्या लागू असलेले निर्बंध काही प्रमाणात शिथील करण्यास सुरुवात केली आहे.

वॉशिंग्टन : कोरोना साथीमुळे बहुतांश उद्योगधंदे बंद असल्यामुळे अमेरिकेत बेकारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यातून आणखी समस्या निर्माण होऊ नये याकरिता त्या देशातील एकूण राज्यांपैकी निम्म्या राज्यांनी सध्या लागू असलेले निर्बंध काही प्रमाणात शिथील करण्यास सुरुवात केली आहे.अमेरिकेतील प्रत्येक राज्यात कोरोना फैलावाची स्थिती निरनिराळी आहे. त्यानुसार या राज्यांतील प्रशासन रेस्टॉरंट, किरकोळ व्यापार व अन्य उद्योग-धंद्यांवरील निर्बंध किती प्रमाणात शिथिल करावेत याचा निर्णय घेणार आहे. कोरोना साथीच्या तडाख्यामुळे अमेरिकेमध्ये सुमारे ३ कोटी लोक ांनी बेकारी भत्ता मिळावा म्हणून आपल्या नावाची नोंदणी सरकार दरबारी केली आहे. हे बेकारी मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचेच हे निदर्शक आहे. ही समस्या अधिक उग्र होऊ नये म्हणून निर्बंध शिथिल करावेत, अशी मागणी जनतेकडून करण्यात येत होती. अमेरिकेतील एकूण कामगारांपैकी १८.४ टक्के लोक सध्या बेकार झाले असावेत, असा एक अंदाज आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी फिजिकल डिस्टन्सिंग आवश्यक आहे. त्यासाठी अमेरिकेतील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत.>थर्मल स्क्रिनिंगच्या सुविधेचा विस्तार कराअमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ अ‍ॅलर्जी अँड इनफेक्शियस डिसिजेस (एनआयएआयडी) या संस्थेचे संचालक डॉ. अँथनी फॉसी यांनी सांगितले की, अमेरिकेतील विविध राज्यांनी निर्बंध शिथील केले तरी काही गोष्टींची दक्षता मोठ्या प्रमाणावर घ्यावी लागेल. नागरिकांचे थर्मल स्क्रिनिंग करण्याच्या सुविधेचा आणखी विस्तार करावा लागेल. नागरिकांकडून फिजिकल डिस्टन्सिंग व्यवस्थित न पाळले गेल्यास ही साथ पुन्हा डोके वर काढू शकते.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पcorona virusकोरोना वायरस बातम्या