शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
5
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
6
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
7
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
8
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
9
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
10
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
11
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
12
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
13
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
14
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
15
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
16
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
17
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
18
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
19
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
20
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

फुटबॉल टीमला काढण्यासाठी डोंगराचे कडे खोदणे सुरू, नौदलाकडून १00 ठिकाणी खोदकाम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2018 4:50 AM

गेल्या दोन आठवड्यांपासून थायलंडमधील सर्वात मोठ्या गुहेत अडकलेल्या लहान मुलांच्या फुटबॉल संघाला व त्यांच्या प्रशिक्षकाला बाहेर काढण्यासाठी ज्या डोंगरात ती गुहा आहे, त्या डोंगराचा कडा ड्रिल मशिनने किमान १00 ठिकाणी खोदून त्यांचा शोध घेण्याचे आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

माए साई - गेल्या दोन आठवड्यांपासून थायलंडमधील सर्वात मोठ्या गुहेत अडकलेल्या लहान मुलांच्या फुटबॉल संघाला व त्यांच्या प्रशिक्षकाला बाहेर काढण्यासाठी ज्या डोंगरात ती गुहा आहे, त्या डोंगराचा कडा ड्रिल मशिनने किमान १00 ठिकाणी खोदून त्यांचा शोध घेण्याचे आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. तसे केल्याने या मुलांपर्यंत शक्य होईल, असे नौदलाच्या अधिकाऱ्यांना वाटत आहे.त्यांना बाहेर काढण्याचे काम थायलंडच्या नौदलाकडे सोपविण्यात आले आहे. त्यांना मदत करण्यासाठी एका माजी नौदल सैनिक या मोहिमेत सहभागी झाला होता. तो गुहेच्या आतील भागात गेल्यानंतर तेथील प्राणवायुचा पुरवठा थांबल्याने तो मरण पावला. त्याच्याबद्दल देशभर दु:ख व्यक्त होत असून, या मुलांची प्रत्यक्ष सुटका व्हावी, यासाठी सर्वत्र प्रार्थना सुरू आहेत.नौदलाने डोंगराच्या कड्याचा भाग १00 ठिकाणी ड्रिल मशिनने खणण्याचे काम सुरू केले असून, एका विशिष्ट ठिकाणी तब्बल ४00 मीटर खोल ते काम केले. तरीही ती मुले नेमकी कुठे आहेत, हे अद्याप समजू शकलेले नाही. आणखी २00 मीटर खोलवर खणत राहावे लागेल, असा अंदाज आहे, असे या मोहिमेच्या प्रमुखाने म्हटले आहे. मात्र, आतमध्ये अडकलेल्या सर्वांना प्राणवायूचा पुरवठा होत राहावा, यासाठी पाइपलाइन टाकून पूर्ण झाली आहे. त्यामुळे मुले व प्रशिक्षकांना श्वासोच्छवासात कोणतेही अडथळे आलेले नाहीत.वर्ल्डकप फायनलचे निमंत्रणसध्या रशियात वर्ल्ड कप फुटबॉलचे सामने सुरू आहेत. फिफाच्या अध्यक्षांनी आत अडकलेल्या सर्व मुलांच्या सुटकेसाठी प्रार्थना करतानाच, सुटकेनंतर त्यांना अंतिम सामना पाहायला येण्याचे निमंत्रण दिले आहे. त्यामुळे ही मुले आनंदून गेली आहेत. (वृत्तसंस्था)प्रशिक्षकाने मागितली माफीदरम्यान, फुटबॉल टीमच्या प्रशिक्षकाने सर्व मुलांच्या पालकांची माफी मागितली आहे. तुमची सर्व मुले सुखरूप आहेत, मी त्यांची काळजी घेईनच, पण सर्व पालकांची मी माफी मागतो, असे प्रशिक्षकाने लिहिले आहे. तुम्ही दिलेल्या मानसिक पाठिंब्यासाठी मी आभारी आहे, असेही त्याने पत्रात नमूद केले आहे. या सर्व मुलांशी संपर्क झाला आहे, पण त्यांना बाहेर काढण्यात सतत काही ना काही अडचणी येत आहेत. 

टॅग्स :ThailandथायलंडFootballफुटबॉल