ऑनलाइन लोकमतफिलिपाइन्स, दि. 28 - एखाद्या सैनिकांने तीन महिलांशी बलात्कार केल्यास त्याची जबाबदारी मी घेईन, असं वादग्रस्त आणि धक्कादायक विधान फिलिपाईन्सचे राष्ट्रपती रॉड्रिगो ड्युटर्ट यांनी केरत वाद ओढावून घेतला आहे. एखाद्या जबाबदार व्यक्तीने महिलांविषयी असे बेताल विधान करुन वाद ओढावून घेतला आहे. राष्ट्रअध्यशांच्या या बेताल वक्तव्यामुळे जगभरातून त्यांना टीकेला सामोरं जाव लागत आहे. सर्वच स्थरावरुन त्यांच्यावर टीका होत आहे. ड्युटर्ट यांनी अप्रत्यक्षपणे सैनिकांना बलात्कार करण्यासाठी प्रोत्साहनच दिले अशी खंत महिला संघटनांनी व्यक्त केली आहे.शुक्रवारी सैन्यातील जवानांशी संवाद साधताना फिलिपाइन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो ड्युटर्ट यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे. सैन्याच्या जवानांचे मनोबल वाढवण्यासाठी रॉड्रिगो ड्युटर्ट यांनी जवानांशी संवाद साधला. पण भाषणादरम्यान ड्युटर्ट यांची जीभ घसरली. जगभरातून टिका होत असल्याचे पाहून आपल्या वक्तव्याची सारवासारव केली. मिंडनाओमध्ये मार्शल लॉ लागू असताना सैनिकांनी अत्याचार केला तर त्याची जबाबदारी आपण घेऊ, असं आपल्याला म्हणायचं होतं, असं ड्युटर्ट म्हणाले.गेल्या आठवड्यात मारावी या शहरात ड्युटर्ट यांनी 60 दिवसांसाठी मार्शल लॉ लागू केला आहे. सुमारे दोन लाख लोकसंख्या असलेल्या या शहरात आयसिस समर्थक दहशतवादी संघटना सक्रीय आहे. या संघटनेच्या तळांवर फिलिपाइन्स सैन्याने हवाई हल्लेही सुरु केले आहे. मार्शल लॉच्या काळात तुम्हाला कोणत्याही घरात घुसून चौकशी करण्याचे अधिकार आहेत असे ड्युटर्ट यांनी सांगितले. ड्युटर्ट त्यांच्या विधानावर ठाम असून त्यांनी गंमतीने असे विधान केल्याचे सांगितले जाते.
राष्ट्राध्यक्षांचे बेताल वक्तव्य, सैनिकाने बलात्कार केल्यास जबाबदारी घेईन
By admin | Published: May 28, 2017 12:53 PM