Alaska Mountain : एलिअन्स आणि यूएफओबाबत दररोज वेगवेगळे दावे केले जातात. जगभरात अनेक लोकांनी एलिअन्स आणि यूएफओ बघितल्याचा दावा केला आहे. अनेकदा एलिअन्स आणि यूएफओबाबत असे दावे केले जातात की, ते वाचून हैराण व्हायला होतं. वर्षानुवर्षे वैज्ञानिक याचाच शोध घेत आहे की, अंतराळात दुसऱ्या ग्रहावर जीवन आहे का? एलिअन्सचं अस्तित्व आहे का? पण अजूनही याबाबत ठोस असे पुरावे सापडले नाही. एलिअन्स आणि यूएफओ बघीतल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहे. पण त्याबाबत ठोस पुरावे सापडले नाहीत.
नुकतीच एक अशी घटना समोर आली ज्याने लोक हैराण झाले आहेत. अलास्काच्या आकाशात एक अजब ढग बघण्यात आला. काही लोकांनी दावा केला आहे की, या भागात एलिअन्सचं एअरक्राफ्ट क्रॅश झालं. आता याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आलं आहे की, ही अजब घटना अमेरिकेच्या उत्तर राज्यात घडली आहे. इथे लेजी माउंटेनवर अजब ढग दिसून आले. काही लोकांनी या घटनेचे फोटो काढले. लोकांकडून काढलेले हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. काही लोकांना वाटलं की, विमान क्रॅश झालं. पण तशी काही बातमी मीडियात आली नव्हती.
विमान क्रॅश झाल्याची काहीच बातमी नसल्याने लोकांच्या यूएफओ दाव्याला जास्त वजन मिळालं. काही लोकांनी सांगितलं की, हे एखादं गुप्त सैन्य हत्यार होतं. त्यामुळे अजब ढग बघायला मिळाले. सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल झाल्यावर अधिकाऱ्यांनी चौकशी केली. पर्वतावर एक टिम पाठवण्यात आली. हेलिकॉप्टरनेही पाहणी करण्यात आली. पण कोणताही मलबा किंवा संशयास्पद वस्तू दिसली नाही.