बीजिंग : साम्यवादी चीनमधील अनेक घटना तिथेच दाबल्या जातात. अशा घटनांना क्वचितच कधी पाय फुटून त्या जगासमोर येतात. अशीच एक घटना चीनमध्ये समोर आली आहे. ‘एक दाम्पत्य, एक अपत्य’ या कठोरपणे राबवल्या गेलेल्या धोरणाला एका दाम्पत्याने अक्षरशः हरताळ फासत तब्बल १५ अपत्यांना जन्म दिल्याने ११ सरकारी अधिकाऱ्यांना निलंबित व्हावे लागले आहे.
एका दाम्पत्याने १९९५ ते २०१६ या कालावधीत १५ मुलांना जन्म दिला. दाम्पत्याने एकाच अपत्याला जन्म द्यावा, असे धोरण असतानाच्या काळात घडलेला हा प्रकार एका सरकारी पाहणीमुळे उजेडात आला.
लोकसंख्येचा समतोल ढळण्याची भीतीचीनची लोकसंख्या २०२१ साली १४१ कोटी होती. चीनचा जन्मदर गेल्या पाच वर्षांपासून सतत घटत आहे. त्यामुळे लोकसंख्येचा समतोल ढळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आता प्रत्येक दाम्पत्याने दोन मुलांना जन्म द्यावा, असे चीनचे सरकारच सांगत आहे.
सबसिडी योजनेचे लाभार्थीn ज्यांना १५ मुले आहेत, त्या दाम्पत्यातील पतीचे नाव लियांग असून, त्याचे वय ७६ वर्षांचे आहे, तर त्याची पत्नी लू हॉन्गलेन ही ४७ वर्षे वयाची आहे. n लियांग व लू यांची भेट सर्वप्रथम १९९४ साली गुआंग्डोंग येथे झाली. त्यानंतर त्यांनी विवाह केला; पण त्याची नोंदणी केली नाही. n हे दाम्पत्य गरिबांना मिळणाऱ्या सबसिडी योजनेचे २०१५ ते २०१९ या कालावधीत लाभार्थी होते. लियांग हे लू यांच्यापेक्षा ३० वर्षांनी मोठे आहेत. त्यांच्या १५ मुलांपैकी बहुतांश जणांचा जन्म घरीच झाला आहे.
... तर झाला असता कैक वर्षांचा तुरुंगवासचीनमध्ये ‘एक दाम्पत्य-एक अपत्य’ हे धोरण १९७९ सालापासून अमलात आले. जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश अशी चीनची ओळख आहे. त्यामुळे लोकसंख्या नियंत्रणाचे धोरण आखण्यात आले. त्या काळात लियांग व लू यांनी नियम मोडल्याचे लक्षात आले असते, तर त्यांना कैक वर्षांचा तुरुंगवास झाला असता. चीनमध्ये २०१५ साली एक दाम्पत्य व त्यांची दोन मुले, असे धोरण अमलात आले.