ऑनलाइन लोकमत
वेलिंग्टन, दि.02 - न्यूझीलंडमध्ये समुद्र किनारी भागाला गुरुवारी भूकंपाचा जोरदार झटका बसला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ७.१ इतकी नोंदली गेली आहे.
उत्तर बेटावर जिसबोर्नपासून १६७ कि.मी. अंतरावर सुमारे ३० कि.मी. खोलवर या भूकंपाचे केंद्र होते. अनेक इमारतींना मिनिटभर या भूकंपाचा हादरा बसला. समुद्रकिनार्यालगतच्या किमान शंभर कि.मी.पर्यंतच्या इमारतींना या भूकंपाचा धक्का जाणवला.
दरम्यान, या भूकंपानंतर त्सुनामीचा धोका नसल्याचे सांगण्यात आले आहे.