केमन बेटांच्या नैऋत्येस कॅरिबियन समुद्रात ७.६ तीव्रतेचा भूकंप झाला आणि काही बेटे आणि देशांनी त्सुनामी आल्यास किनारपट्टीजवळील लोकांना इशारा देण्यात आला आहे. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेने ही माहिती दिली आहे. यूएसजीएसने सांगितले की, भूकंप स्थानिक वेळेनुसार सायंकाळी ६:२३ वाजता झाला आणि त्याची खोली १० किलोमीटर होती. त्याचा केंद्रबिंदू केमन बेटांमधील जॉर्ज टाउनपासून १३० मैल नैऋत्येस होता.
‘शीशमहल’ ढासळला, दिल्लीत कमळ फुलले; भाजपाला ४० जागांचा फायदा, 'आप'ला बसला फटका
अमेरिकेच्या राष्ट्रीय त्सुनामी चेतावणी केंद्राने म्हटले आहे की, अमेरिकेच्या मुख्य भूभागावर त्सुनामीचा इशारा देण्यात आलेला नाही, पण प्यूर्टो रिको आणि यूएस व्हर्जिन बेटांसाठी त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे. धोका व्यवस्थापन केमन बेटांनी किनाऱ्याजवळील रहिवाशांना आतल्या भागात आणि उंच ठिकाणी स्थलांतर करण्याचे आवाहन केले आहे.समुद्राच्या लाटा ०.३ ते १ मीटर उंचीपर्यंत असण्याची शक्यता आहे.
त्सुमानीचा इशारा
प्यूर्टो रिकोच्या गव्हर्नर जेनिफर गोंझालेझ कोलोन यांनी एका निवेदनात म्हटले की, त्सुनामीच्या इशाऱ्यानंतर त्या आपत्कालीन संस्थांच्या संपर्कात होत्या, पण त्यांनी कोणालाही किनारा सोडण्याचा सल्ला दिला नाही. डोमिनिकन सरकारने त्सुनामीचा इशारा देखील जारी केला आणि किनाऱ्यावर राहणाऱ्या रहिवाशांना "समुद्रसपाटीपासून २० मीटरपेक्षा जास्त आणि जमिनीच्या आत २ किलोमीटर अंतरावर" उंच भागात जाण्याचा सल्ला दिला.
तसेच पुढील काही तास जहाजांना दूर जाण्याचे किंवा समुद्रात प्रवेश करणे टाळण्याचे आवाहन केले. क्युबन सरकारने लोकांना किनारी भाग सोडण्याचे आवाहन केले. होंडुरासमधील अधिकाऱ्यांनी सांगितले की, नुकसानीचे कोणतेही तात्काळ वृत्त नाही पण पुढील काही तासांत रहिवाशांना समुद्रकिनाऱ्यांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे, असे स्थानिक माध्यमांनी वृत्त दिले आहे.