तुर्कस्तान आणि ग्रीसच्या सीमेवर शुक्रवारी भूकंपाचा जोरदार धक्का बसला. यामुळे ग्रीसवर त्सुनामीचे संकट असून तुर्कस्तानमध्येही मोठी पडझड झाली आहे. इजमिरमध्ये अनेक इमारती जमिनदोस्त झाल्या आहेत. 7 रिश्टर स्केलचा भूकंप झाला आहे.
प्राथमिक माहितीनुसार तुर्कस्तानमध्ये चार जणांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक जण जखमी झाले आहेत. तुर्कस्तानचे आरोग्य मंत्री फहार्टिन कोका यांनी सांगितले की, आपल्या चार नागरिकांनी भूकंपामध्ये प्राण गमावले आहेत. तुर्कस्तानच्या किनाऱ्य़ावरील शहर इजमिरमध्ये इमारती कोसळल्या आहेत. इजमिरच्या गव्हर्नरांनी सांगितले की, 70 लोकांना वाचविण्यात आले आहे.