शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

श्रीलंकेत खदखद कायम; मंत्रिमंडळाचा राजीनामा, सरकारमध्ये सहभागी होण्याचे अध्यक्षांचे आमंत्रण विरोधी पक्षांनी साफ धुडकावले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2022 8:36 AM

Sri Lanka News: अर्थव्यवस्थेच्या हाताळणीत सपशेल अपयशी ठरलेल्या महिंदा राजपक्षे यांच्या सरकारच्या संपूर्ण मंत्रिमंडळाने रविवारी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली.

कोलम्बो : अर्थव्यवस्थेच्या हाताळणीत सपशेल अपयशी ठरलेल्या महिंदा राजपक्षे यांच्या सरकारच्या संपूर्ण मंत्रिमंडळाने रविवारी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली. यातून मार्ग  काढण्यासाठी अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी विरोधी पक्षांना सरकारात सामील होण्याचे आमंत्रण दिले. मात्र, सरसकट सर्व विरोधकांनी अध्यक्षांचे हे आमंत्रण धुडकावून लावले. दरम्यान, आणीबाणीमुळे देशात निर्माण झालेली खदखद कायम आहे.

पंतप्रधान राजपक्षे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला आर्थिक धोरणांची नीट हाताळणी करता न आल्याने श्रीलंकेत अभूतपूर्व स्थिती आल्याने तेथे आणीबाणी जारी करण्यात आली. शनिवारी सायंकाळी संचारबंदीही लागू करण्यात आली. मात्र, तरीही देशभरात सरकारविरोधात निदर्शने सुरू राहिली. रविवारी रात्री मंत्रिमंडळातील सर्व २६ मंत्र्यांनी  आपला राजीनामा सोपवला. मात्र, पंतप्रधान राजपक्षे यांनी राजीनामा दिलेला नाही. त्यामुळे अध्यक्षांनी चार जणांकडे महत्त्वाची खाती सोपवली आहेत. कारभार सुधारण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येत सरकार स्थापन करावे, असे आवाहन अध्यक्षांनी केले. मात्र, त्यास विरोधकांनी नकार दर्शवला. या संकटांना राजपक्षे परिवार जबाबदार असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला. (वृत्तसंस्था) 

शेअर बाजाराचे सर्व व्यवहार ठप्प श्रीलंकेतील शेअर बाजार सोमवारी सकाळी उघडल्यानंतर काही सेकंदातच तिथले सर्व व्यवहार ठप्प झाले. मंत्रिमंडळातील सर्वच सदस्यांनी राजीनामा दिल्याच्या घडामोडीचा परिणाम होऊन शेअर बाजाराचा निर्देशांक ५.९ टक्क्यांनी घसरला. आर्थिक संकटाचाही मोठा तडाखा श्रीलंका शेअर बाजाराला बसला.

टॅग्स :Sri Lankaश्रीलंकाEconomyअर्थव्यवस्थाPoliticsराजकारण