शहरं
Join us  
Trending Stories
1
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
2
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
3
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
4
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
5
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
6
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
7
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
8
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
9
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
10
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
11
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
12
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
13
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
14
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
15
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
16
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
17
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
18
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
19
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
20
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ

खेळाडूंची राजकारणातील यशस्वी ‘खेळी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 1:07 AM

पाकिस्तानच्या क्रिकेट संघाचे माजी कर्णधा इम्रान खान हे पाकिस्तानचे पंतप्रधान होण्याच्या मार्गावर

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या क्रिकेट संघाचे माजी कर्णधा इम्रान खान हे पाकिस्तानचे पंतप्रधान होण्याच्या मार्गावर आहेत. या पदावर त्यांचे विराजमान होणे निश्चीत झाले आहे. त्या निमित्ताने राजकारणात यशस्वी झालेल्या खेळाडूंचा घेतलेला आढावा.पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सध्या इम्रान खानचे नाव पुढे आहे. १९९२ चा क्रिकेट विश्वचषक पाकिस्तानला जिंकून देणारा कर्णधार म्हणून आतापर्यंत इम्रान यांची ओळख होती. मात्र आता हे पाकिस्तानचे ‘वजिर ए आझम’ बनतील. १९८० च्या दशकात पाकिस्तानच्या संघाचा जो दबदबा जागतिक क्रिकेटमध्ये होता. तो निर्माण करण्यास कारणीभूत असलेल्या काही महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक म्हणजे इम्रान खान. १९८७ च्या विश्वचषकानंतर त्यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली मात्र त्यांनी पुनरागमन केले आणि संघाला १९९२ चा विश्वचषक जिंकून दिला. इंझमाम उल हक, वसीम अक्रम, वकार युनुस हो पाकिस्तान क्रिकेटचे तारे इम्रान यांनीच शोधले होते. वसीम अक्रम यांच्या पेक्षा जास्त कौशल्यपुर्ण गोलंदाज होेते. अक्रम त्यांच्याकडून रिव्हर्स स्विंगची कला शिकले होते. त्याकाळात अष्टपैलू खेळाडूंमध्ये मोठी स्पर्धा होती. कपील देव नैसर्गिक प्रतिभेचे धनी होते. तर रिचर्ड हॅडली शिस्तप्रिय, इयान बॉथम यांना अत्यंत हुशार म्हणून ओळखले जात होते. मात्र आॅक्सफोर्डमध्ये शिकलेले इम्रान खान हे जगातील कोणत्याही फलंदाजाला धडकी भरवु शकत होते. भारतातही त्यांची लोकप्रियता मोठी होती.राजकारणातील त्यांचा आतापर्यंतचा प्रवासही क्रिकेट कारकिर्दीसारखा संघर्षमय राहिला आहे. गेल्या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर वैयक्तिक आयुष्यातही मोठे वादळ उठले. त्यावर मात करत त्यांनी पाकिस्तानच्या राजकारणातील सर्वात मोठे व्यक्ती बनण्याचा मान मिळवला आहे.इडी अमीनवर्षानुवर्षे युगांडाला दहशतीत ठेवणारा हुकूमशाह म्हणून इडी अमिन याची इतिहासात नोंद आहे. मात्र हाच हुकूमशाह एक बॉक्सर होता. आधी ब्रिटीश आणि नंतर युगांडाच्या सैन्यात असलेल्या अमीन याने १९५१ ते १९६० या काळात युगांडातील लाईट हेवीवेट चॅम्पियनशीप आपल्याकडेच ठेवली होती. युगांडाच्या इतिहासात एक यशस्वी बॉक्सर म्हणूनही आमीनची ओळख आहे.अर्नाल्ड श्वेत्झनेगरअर्नाल्ड यांनी वयाच्या २० व्या वर्षी शरिरसौष्ठवात मिस्टर युनिव्हर्स हा किताब पटकावला. त्यानंतर त्यांनी लेखन केले काही काळ गुंतवणूकदार म्हणूनही काम केले. ते समिक्षकही होते. हॉलिवूडमध्ये अभिनेता म्हणून यश मिळवल्यावर त्यांनी २००३ ते २०११ या काळात दोन टर्म अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे गव्हर्नर म्हणून काम पाहिले. शरीरसौष्ठवात त्यांना प्रेरणा मानले जाते.नवज्योत सिंह सिद्धू१९८३ मध्ये भारतीय क्रिकेट संघात नवज्योत सिंह सिंधू यांनी पर्दापण केले. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावर सिद्धू यांनी समालोचन, टीव्ही शोजमध्ये काम केले. त्यानंतर ते भाजपकडून दोन वेळा अमृतसरचे खासदार राहिले होते. सध्या ते पंजाब सरकारमध्ये मंत्री आहेत.मॅ़नी पॅकियायोव्यावसायिक बॉक्सर आणि पाच वेळचा विश्वविजेता फिलीपिन्सच्या मॅनी पॅकियायो याची ओळख आहे. पॅकियायो सध्या फिलिपिन्समध्ये सारांगनी प्रांताचा सिनेटर म्हणूनही कार्यरत आहे. २००७ च्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर पॅकियायो याने २०१० आणि २०१६ मध्ये निवडणुकीत विजय मिळवला.राज्यवर्धनसिंह राठोडभारताचे क्रीडा मंत्री असलेले राज्यवर्धन सिंह राठोड हे अथेन्स आॅलिम्पिक २००४ चे रौप्य पदक विजेते नेमबाज देखील आहे. त्यांनी डबल ट्रॅप या प्रकारात रौप्य पदकाची कमाई केली होती. राठोड जयपूर ग्रामीणमधून २०१४ मध्ये खासदार झाले. त्यांच्याकडे माहिती आणि प्रसारण खात होते.सनथ जयसुर्याश्रीलंकेचा यशस्वी फलंदाज असलेल्या जयसुर्या हा महिंद्र राजपक्षे यांच्या कॅबिनेटमध्ये मंत्री म्हणूनही काम केले आहे. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावर २०१० मध्ये जयसुर्याने श्रीलंकेतील मटारा येथून निवडणूक लढवली. त्यात विजयी झाला. श्रीलंकेच्या पार्लिमेंटमध्ये तो २०१० ते २०१५ या काळात सदस्य होता.मोहम्मद अझरुद्दीनभारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन याने देखील राजकारणात यश मिळवले आहे. २००९ ते २०१४ या काळात अझरुद्दीन हे उत्तर प्रदेशातील मुरादाबादचे खासदार होते. भारतीय क्रिकेटमधील यशस्वी कर्णधार म्हणून त्यांचा उल्लेख होतो.गॅरी कास्पारोव्ह१९८५ मध्ये वयाच्या २२ व्या वर्षी बुद्धिबळात विश्व विजेतेपद पटकावणाऱ्या गॅरी कास्पारोव्ह यांची ओळख रशियाच्या राजकारणात अध्यक्ष ब्लामिदीर पुतिन यांचे विरोधक म्हणून आहे. त्यांनी पुतिन यांच्या विरोधात अध्यक्षीय निवडणुक लढवण्याचे देखील ठरवले होते. मात्र काही कारणांमुळे त्यांना माघार घ्यावी लागली.

टॅग्स :Imran Khanइम्रान खानSportsक्रीडाCricketक्रिकेट