नवी दिल्ली - भारतीय वेळेनुसार आज सकाळी 7.18 वाजता सुरु झालेले सूर्यग्रहण सकाळी 8.13 वाजता संपले आहे. ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार याचा मोक्षकाळ 9.43 वाजेपर्यंत होता. आजचे हे सूर्यग्रहण भारतात दिसून आले नाही. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया येथे हे ग्रहण दिसत होते. यानंतर 27 जुलै रोजी दुसरे चंद्रगहण दिसणार आहे. हे चंद्रग्रहण भारतात दिसणार असल्याचे खगोलशास्त्र विभागाची माहिती आहे.
भारतासह युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, नॉर्थ अमेरिका आणि अटलांटिक येथे हे चंद्रगहण दिसणार आहे. आजपर्यंतचे हे सर्वाधिक काळ चालणारे चंदग्रह ठरणार आहे. तर 11 ऑगस्ट रोजी यंदाच्या वर्षातील तिसरे सूर्यग्रहण लागणार आहे. मात्र, हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. हे सूर्यग्रहण पूर्व युरोप, आशिया नॉर्थ अमेरिका आणि आर्कटिक येथे दिसणार आहे. त्यानंतर 6 जानेवारी 2019 रोजी लागणार असून ते संपूर्ण आशिया खंडात दिसणार आहे. दरम्यान, या वर्षातील पहिले चंद्रग्रहण 31 जानेवारी रोजी दिसले होते. भारतासह युरो, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि नॉर्थ अमेरिकेत येथेही हे सूर्यग्रहण दिसले होते.