अबुजा : नायजेरियाच्या ईशान्येकडील शहर पोटीस्कुम येथील सरकारी तंत्रज्ञान महाविद्यालयात झालेल्या आत्मघाती स्फोटात 48 जण ठार झाले असून, त्यातील बहुतांश विद्यार्थी आहेत. महाविद्यालयाचे वर्ग सुरू होण्यापूर्वी मुले प्रार्थनेसाठी जमलेली असताना हा स्फोट घडवून आणण्यात आला.
आत्मघाती हल्लेखोर विद्याथ्र्याचा गणवेश घालून आला होता. त्यामुळे हल्लेखोर ओळखू आला नाही. या स्फोटाची जबाबदारी अद्याप कोणीही घेतलेली नाही. पण योबे राज्यातील हा भाग इस्लामवादी संघटना बोको हरामच्या बंडखोरांचा गड समजला जातो. आता आमच्या हातात 48मृतदेह आहेत; पण जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे, असे शाळेतील शिक्षकांनी सांगितले. (वृत्तसंस्था)