शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

हवाई तळावर आत्मघाती हल्ला

By admin | Published: September 19, 2015 1:57 AM

तालिबान दहशतवाद्यांनी पाकिस्तान हवाई दलाचा येथील तळ आणि त्यातील मशिदीवर शुक्रवारी केलेल्या धाडसी हल्ल्यात २३ सैनिकांसह ४२ जण ठार झाले. मृतांपैकी

पेशावर : तालिबान दहशतवाद्यांनी पाकिस्तान हवाई दलाचा येथील तळ आणि त्यातील मशिदीवर शुक्रवारी केलेल्या धाडसी हल्ल्यात २३ सैनिकांसह ४२ जण ठार झाले. मृतांपैकी १३ दहशतवादी असून हल्ल्यादरम्यान उडालेल्या चकमकीत त्यांचा खात्मा झाला. दहशतवादी लष्करी गणवेशात आले होते. आत्मघाती जॅकेट, एके-४७ रायफल ग्रेनेड, उखळी तोफांनी सज्ज दहशतवाद्यांच्या एका गटाने प्रारंभी एका सुरक्षा चौकीवर हल्ला केला आणि त्यानंतर ते बडाबेर हवाई तळात घुसले. हा तळ पेशावरपासून सहा कि.मी.वर आहे. हवाई तळावरील हल्ल्यात ठार झालेल्या ४२ जणांत एका कॅप्टनचा समावेश आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पाक हवाई दलाचे दोन कनिष्ठ तंत्रज्ञही ठार झाले. हल्ल्याच्या वेळी ते सुरक्षाकक्षात तैनात होते, अशी माहिती हवाई दलाच्या प्रवक्त्याने दिली. सुरक्षा दलांनी सर्वच्या सर्व १३ दहशतवाद्यांचा खात्मा केला. तळातील मशिदीत लोक नमाज अदा करीत होते. दहशतवाद्यांनी त्यांना ठार केले, असे ते म्हणाले. दहशतवादी लष्करी गणवेशात आले होते. दोन ठिकाणांहून तळात घुसल्यानंतर ते छोट्या छोट्या गटात विभागले. त्यांची सुरक्षा दलाशी तुफान चकमक उडाली. या हल्ल्यात आठ सैनिक आणि दोन वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांसह २९ जण जखमी झाले, असेही बाजवा यांनी म्हटले आहे. जखमींना पेशावर आणि लेडी रीडिंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेहरिक ए तालिबानने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. आमच्या आत्मघातकी पथकाने हा हल्ला घडवून आणला, असे तालिबानचा प्रवक्ता मोहंमद खुरसानी यांनी ई-मेलद्वारे सांगितले. ८० सुरक्षा कर्मचाऱ्यांना घेरण्यात आले असून त्यातील ५० जणांना ठार करण्यात आले. महिला व बालकांना सुरक्षितरीत्या बाहेर जाऊ देण्यात आले, असा दावाही खुरसानी याने केला; मात्र त्या दाव्याला दुजोरा मिळाला नाही. (वृत्तसंस्था)