ऑनलाइन लोकमत
काबूल, दि. २० - अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये असलेल्या रशियाच्या राजदूताजवळ आत्मघाती बॉम्बस्फोट करण्यात आला. या बॉम्बस्फोटात १२ जणांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त असून अनेक जण जखमी झाले आहेत.
काबूलमध्ये असलेल्या रशियाच्या राजदूत कार्यालयाजवळ एका बसमध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट घडवून आणला. या बॉम्बस्फोटात आत्तापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाल्याचे समजते, तर अनेक जण जखमी झाले आहे. घटनास्थळी पोलीस अधिकारी आणि बचाव पथक दाखल झाले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. दरम्यान, या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्विकारली नसल्याचे समजते.
काबूलमध्ये नवीन वर्षात आत्तापर्यंत करण्यात आलेला हा सहावा बॉम्बस्फोट असल्याचे सांगण्यात येत आहे.
More than 12 dead & injured in Kabul suicide bombing targetting civilian bus close to Russian embassy: Afghan Media pic.twitter.com/SIuvIRanAb— ANI (@ANI_news) January 20, 2016