Suicide Capsule Woman Death:स्वित्झर्लंडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने पहिल्यांदाच 'सुसाइड कॅप्सूल'चा वापर करुन आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. 'सरको' नावाची ही सुसाईड कॅप्सूल आहे, ज्यामध्ये 'डेथ बटन' दाबून एखादी व्यक्ती स्वतःचा जीव घेऊ शकते. हे बटण दाबताच कॅप्सूलमध्ये नायट्रोजन वायू भरला जातो, ज्यामुळे व्यक्ती झोपी जाते आणि काही मिनिटांतच ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे (हायपोक्सिया) त्याचा मृत्यू होतो.
बटण दाबल्यावर मृत्यूही घटना स्वित्झर्लंडमधील मारीशौसेन येथील जंगलाजवळ घडली. मृत्यू झालेली 64 वर्षीय महिला अमेरिकेची रहिवासी होती. अशाप्रकारे आत्महत्या करण्यासाठी ती अमेरिकेहून स्वित्झर्लंडला आली होती. 'सुसाइड कॅप्सूल'द्वारे आत्महत्या करणारी ही पहिली व्यक्ती ठरली आहे. या घटनेच्या काही तासांनंतर पोलिसांनी अनेकांना आत्महत्येस प्रवृत्त आणि मदत केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. दरम्यान, सरको सुसाईड कॅप्शूल एक वादग्रस्त उपकरण आहे. यामध्ये बसून व्यक्ती स्वतःच्या हाताने बटण दाबून आत्महत्या करू शकतो.
स्वित्झर्लंडमधील आत्महत्या कायदे आणि विवादस्वित्झर्लंडमध्ये आत्महत्येला कायदेशीर परवानगी आहे. कायद्यानुसार आत्महत्या करणारी व्यक्ती कुणाची मदतदेखील घेऊ शकते. पण, आत्महत्येसाठी मदत करणाऱ्या लोकांचा स्वार्थी हेतू नसावा. अन्यथा त्यांना दोषी मानले जाते. मात्र, 'सरको' कॅप्सूलच्या वापराबाबत स्वित्झर्लंडच्या विविध प्रांतांमध्ये मतभेद आहेत. सुसाईड कॅप्सूलमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या कॅप्सूलकडे भविष्यातील आत्महत्येची पद्धत म्हणून पाहिले जात असले तरी, त्याच्या कायदेशीर आणि नैतिक पैलूंवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या कॅप्सूलचा व्यापक वापर करण्यापूर्वी कायदेशीर आणि नैतिक मापदंडांचा गांभीर्याने विचार करणे बाकी आहे.