शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
4
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
5
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
6
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
7
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
8
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
9
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
11
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
12
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
13
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
15
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
16
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
17
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
18
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
19
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
20
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी

इस्लामाबादमध्ये आता न शिरता हाहाकार करु शकते ब्रह्मोस मिसाइल, पाक राष्ट्रपतीही घाबरले!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 10:50 AM

Sukhoi Fighter Jet Armed With Brahmos Missile: भारताचे सुखोई लढाऊ विमान आता पाकिस्तानात प्रवेश न करता ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या मदतीने इस्लामाबादपर्यंत पोहोचू शकते.

इस्लामाबाद-

भारतीय हवाई दलाने गुरुवारी पाकिस्तान आणि चीनविरुद्ध आपल्या लांब पल्ल्याच्या मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या क्षमतेत लक्षणीय वाढ केली आहे. भारतानं बंगालच्या उपसागरात सुखोई-३० एमकेआय या लढाऊ विमानातून ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या अपग्रेडेड व्हर्जनची यशस्वी चाचणी घेतली. याआधीच्या २९० किमीच्या तुलनेत आता नवीन क्षेपणास्त्राचा पल्ला तब्बल ४५० किमी असू शकतो. हे तेच ब्रह्मोस क्रूझ क्षेपणास्त्र आहे ज्याची पाकिस्तानचे अध्यक्ष आरिफ अल्वी यांना भीती वाटते आणि त्यांनी यापूर्वीही उघडपणे आपली भीती व्यक्त केली होती.

भारताचे सुखोई फायटर जेट हवेत इंधन न भरता १५०० किमीपर्यंत मारा करू शकते. या नवीन ब्रह्मोस क्षेपणास्त्रानं सुसज्ज असताना हे लढाऊ विमान सुमारे २ हजार किमीपर्यंत मारा करू शकतं. अशाप्रकारे, भारतीय हवाई दलानं आता जमिनीवर आणि समुद्रावर लांब पल्ल्याचा मारा करण्याची क्षमता प्राप्त केली आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या मदतीनं शत्रूचं अत्यंत महत्त्वाचं लष्करी तळ, अंडरग्राऊंड बंकर, कमांड अँड कंट्रोल सेंटर्स, समुद्रातील विमानवाहू जहाजं आणि युद्धनौका अगदी सहज नष्ट करता येतात. ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा आणखी एक प्रकार बनवला जात आहे ज्याची मारक क्षमता तब्बल ८०० किमी असणार आहे. हे क्षेपणास्त्र आवाजाच्या तिप्पट वेगानं मारा करू शकतं.

पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनाही ब्रह्मोसची भीतीब्रह्मोसच्या मजबूत ताकदीमुळे पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी देखील घाबरले आहेत. नुकतंच पाकिस्तानी हवाई दलातील मिराज फायटर जेटला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात पाकिस्तानी राष्ट्रपतींनी भारताने ब्रह्मोस-२ क्षेपणास्त्र बनवल्याचा उल्लेख केला होता. या क्षेपणास्त्राचा वेग ८.५ मॅक इतकी आहे. याचा अर्थ ध्वनीच्या वेगापेक्षा ८.५ पट जास्त. ब्रह्मोस क्षेपणास्त्र काही मिनिटांत पाकिस्तानात घुसू शकतं. आपल्याला आपल्या स्वयंघोषित शत्रूविरुद्ध आपला बचाव मजबूत करण्याची गरज आहे, असं आरिफ अल्वी म्हणाल होते.

पाकिस्तानी राष्ट्रपतींनी देशाच्या हवाई दलाचे कौतुक केलं होतं. पाकिस्तानी वायुसेना प्रतिकूल परिस्थितीतही देशाचं रक्षण करण्यास सक्षम आहे. त्यांनी असा दावा केला की पीएएफने काही वेळा मर्यादित संसाधनं असूनही आपली क्षमता सिद्ध केली आहे, विशेषत: भारताच्या गैरप्रकारांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे असं ते म्हणाले होते. पाकिस्ताननं नुकतीच चीनकडून हवाई संरक्षण प्रणाली खरेदी केली आहे, जी भारताच्या S-400 ला उत्तर असल्याचं मानलं जातं आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानindian air forceभारतीय हवाई दल