शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: विधानसभेसाठी भाजपच्या ५० उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार; मुहूर्त ठरला!
2
Haryana Election : अग्निवीरला सरकारी नोकरी, महिलांना २१०० रुपये; भाजपकडून २० मोठी आश्वासने
3
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार; ठाकरेंची डोकेदुखी वाढणार?
4
को-स्टारच्या प्रेमात वेडी झाली 'ही' अभिनेत्री; नातं वाचवण्यासाठी ठेवला काळ्या जादूवर विश्वास
5
बारामतीच्या दोन मुलींना हडपसरमध्ये दारु पाजली, मित्राच्या खोलीत चौघांकडून सामुहिक बलात्कार
6
हे चार राज्यांच्या निवडणुका एकत्र घेऊ शकले नाहीत; वन नेशन, वन इलेक्शनवरून संजय राऊतांचा मोदींना टोला
7
कुछ बडा होने वाला है...! तेजस्वी यादवांनी बोलावली आमदार-खासदारांची तातडीची बैठक
8
Rishabh Pant vs Liton Das:"भावा मला का मारतोस.." अन् लिटन दासवर भडकला पंत (VIDEO)
9
पितृपक्ष: ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी प्रसन्न होईल; कायम मेहेरबान राहील, पितरांची कृपा लाभेल!
10
Vidhan Sabha Election: मुंबईतील 'या' सहा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत तिढा?
11
UNGA : पॅलेस्टाईनच्या मुद्द्यावर भारताची मोठी खेळी, 'या' देशांनी ठरावाच्याविरोधात केलं मतदान! 
12
MBBS प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी बदलला धर्म; 8 जणांचा प्रवेश रद्द, प्रकरण काय?
13
"मी कचरा करणार नाही", मराठी बोलताना अमिताभ बच्चन यांच्याकडून मोठी चूक, मागितली माफी, म्हणाले...
14
रक्ताच्या थारोळ्यात पडला होता भाजपा नेता; पोलिसाने लुटली सोन्याची चेन, ४ अंगठ्या, २ मोबाईल
15
पिता-पुत्रांचा षडाष्टक योग: ८ राशींना संमिश्र, अखंड सावध राहावे; सूर्य-शनीची वक्र दृष्टी!
16
रिकाम्या सीटवर बसण्याठी धावला अन् रेल्वेतून खाली पडला; सात वर्षाच्या मुलाचा मृत्यू
17
Bajaj Housing Finance Ltd: लिस्टिंगच्या ३ दिवसांत १७०% चा नफा; आता 'हा' शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१५६ वर आला भाव
18
Sanjay Roy : "२ दिवसांनी संजय रॉयचे कपडे..."; CBI ने केला पोलिसांवर निष्काळजीपणाचा गंभीर आरोप
19
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसान योजनेनंतर सरकार १००० कोटींचे 'हे' काम करणार!
20
Andheri Lokhandwala Fire: अंधेरीत लोखंडवाला येथे भीषण आग, दोन बंगले जळून खाक

दोन महिन्यांपासून Sunita Williams अंतराळात अडकल्या; गंभीर आजारांचा धोका वाढला...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 7:11 PM

तांत्रिक बिघाडामुळे सुनिता विलियम्स आणि बुच विलमोर दोन महिन्यांपासून अंतराळात अडकले आहेत.

Astronaut Sunita Williams : अंतराळात अडकलेल्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स (sunita williams) यांच्या परतीच्या मार्गात अडचणी वाढल्या आहेत. 2 जून रोजी फक्त दोन आठवड्यांसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर गेलेल्या सुनीता आणि बुच विल्मोर अद्याप पृथ्वीवर परत येऊ शकलेले नाहीत. NASA च्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, ते दोघेही फेब्रुवारी 2025 पूर्वी पृथ्वीवर परत येऊ शकणार नाहीत.

आरोग्यावर गंभीर परिणामबोईंग स्टारलाइनरद्वारे जून महिन्यात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर गेलेल्या सुनीता आणि बुच यांच्या परतीच्या मार्गात मोठ्या अडचणी आहेत. दरम्यान, इतके महिने अंतराळात राहिल्यामुळे दोघांच्याही आरोग्यावर वाईट परिणाम पडू शकतो. आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार, त्यांना अंतराळवीरांच्या डीएनएला धोका आहे. अंतराळातील गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या तुलनेत नगण्य आहे, त्यामुळे हाडे आणि स्नायूंची घनता कमी होऊ शकते. 

स्पेस ॲनिमियाचा धोकाइतकेच नाही, तर अंतराळात दीर्घकाळ राहिल्याने शरीरातील द्रवपदार्थांमध्येही बदल होतो, त्यामुळे पृथ्वीच्या तुलनेत अंतराळात जास्त लाल रक्तपेशी नष्ट होतात. याव्यतिरिक्त, स्पेस रेडिएशनमुळे होणारा ऑक्सिडेटिव्ह ताण लाल रक्तपेशींना नुकसान करतो. नासाच्या मते, पृथ्वीवर एका व्यक्तीच्या शरीरात प्रत्येक सेकंदाला सुमारे 20 लाख लाल रक्तपेशी तयार होतात आणि नष्ट होतात, परंतु अंतराळात ही संख्या 30 लाखांपर्यंत वाढते. त्यामुळे अंतराळवीरांना स्पेस ॲनिमिया होतो.

कर्करोगाचा धोकाअंतराळातील सूक्ष्म गुरुत्वाकर्षणामध्ये हृदय देखील योग्यरित्या कार्य करू शकत नाही. त्यामुळे हृदयाच्या संरचनेतही बदल होतात. याव्यतिरिक्त, स्पेस रेडिएशनच्या संपर्कात आल्याने कर्करोगाचा धोका देखील वाढतो. अंतराळातून परतल्यानंतर अनेक अंतराळवीरांनी डोळ्यांशी संबंधित समस्याही सांगितल्या आहेत.

डीएनए मध्ये असमानतातज्ज्ञांच्या मते, कॉस्मिक रेडिएशन हे अत्यंत उच्च उर्जेच्या कणांनी बनलेले असते. ते संपर्कात येते, तेव्हा डीएनए स्ट्रेंड तुटतात आणि बदल होऊ लागतात. अंतराळवीरांच्या आरोग्याशी संबंधित ही सर्वात गंभीर समस्या आहे. दीर्घकाळ रेडिएशनच्या संपर्कात राहिल्यामुळए मानसिक आरोग्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतो.

सुनीता विल्यम्स अवकाशातून परत कधी येऊ शकणार?सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर 10 दिवसांच्या मोहिमेसाठी गेले होते, परंतु बोईंग स्टारलाइनरमधील तांत्रिक बिघाडामुळे ते गेल्या दोन महिन्यांपासून पृथ्वीवर परत येऊ शकले नाहीत. नासाचे म्हणणे आहे की जर स्टारलाइनर्स परत येणे सुरक्षित मानले गेले नाही तर ते फेब्रुवारी 2025 मध्ये SpaceX च्या क्रू ड्रॅगनसह पृथ्वीवर परत येतील.

टॅग्स :NASAनासाAmericaअमेरिकाisroइस्रोIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीय