शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
Daily Top 2Weekly Top 5

आठ महिन्यांपासून अवकाशात असलेल्या सुनीता विल्यम्स मार्चमध्ये पृथ्वीवर येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 07:53 IST

इथे सर्व काही सुरळीत पार पडले तर पॅराशूटच्या मदतीने उतरणाऱ्या कॅप्सूलमधून सुनीता व बूच सुरक्षित उतरतील.

वॉशिंग्टन : तब्बल आठ महिन्यांपासून अवकाशात अडकून पडलेली भारतीय वंशाची अमेरिकी अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि तिचा सहकारी बूच विल्मोर १९ मार्चपर्यंत पृथ्वीवर परतणार आहेत. इलॉन मस्क यांच्या ‘स्पेस एक्स’च्या ड्रॅगन कॅप्सूलमधून ते परततील.

केवळ आठ दिवसांच्या मोहिमेवर आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर रवाना झालेल्या सुनीता आणि बूच यांच्या परतीच्या मार्गात प्रचंड अडथळे आले, बोइंगच्या स्टारलायनर कॅप्सूलमधून गेल्या ५ जून रोजी स्थानकावर रवाना झालेले दोघे आठ महिन्यांपासून दोघे अवकाशात अडकून पडले आहेत. अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारताच डोनाल्ड ट्रम्प यांनी इलॉन मस्क यांना या अंतराळवीरांना परत आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले होते.या वातावरणात अवकाश यानाचा प्रवेश सर्वात जोखिमीचा. इथे सर्व काही सुरळीत पार पडले तर पॅराशूटच्या मदतीने उतरणाऱ्या कॅप्सूलमधून सुनीता व बूच सुरक्षित उतरतील.

..परतीची मोहीमस्पेस एक्सच्या ड्रॅगन कॅप्सूल ‘क्रू-१०’चा हा प्रवास अत्यंत जोखमेचा असेल. कारण यानाचा वेग असेल ताशी २८ हजार किमी तापमान निर्माण होईल सुमारे १५०० अंश. पृथ्वीकक्षेत प्रवेशानंतर याचा वेग कमी व्हायला प्रारंभ होईल. हे टप्पे नियोजितपणे पार पडले तर पॅराशूटने कॅप्सूल पृथ्वीवर उतरेल. परंतु, यात काही उणिवा राहिल्या तर मात्र ती सर्वात मोठी जोखीम ठरेल. 

क्रू-१० : १२ मार्चला होणार रवाना१२ मार्चला क्रू-१० यान ड्रॅगन कॅप्सूलसह लाँच होईल. अवकाश स्थानकावर ॲनी मॅक्लेन, निकोल एअर्स, ताकुया ओनिशी आणि रोस्कोस्मोस या चौघांना सोडून सुनीता व बूच यांना घेऊन ते परतेल. क्रू घेऊन हे यान रवाना होईल. सुनीता विल्यम्स या मोहिमेत प्रयोगशाळेची कमांडर आहे. तिला आपला कार्यभार नवीन कमांडरकडे सोपवण्यास ५ ते ७ दिवस लागू शकतात. या दृष्टीने १९ मार्चपर्यंत ती पृथ्वीवर परतणे अपेक्षित आहे.

४०० किमी पृथ्वीपासून दूर आहे अवकाश स्थानक १०० किमी अंतरात पृथ्वीपासून आकाशात आहे वातावरण, ०३  तास लागतील वातावरणात प्रवेशानंतर जमिनीवर उतरण्यास

टॅग्स :NASAनासाSunita Williamsसुनीता विल्यम्स