ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 29 - एखादं मूल जेव्हा जन्माला आल्यानंतर किती महिन्यात चालू लागतं ? असा प्रश्न जर का कोणी तुम्हाला विचारला तर याचं तुम्ही सहजपणे उत्तर द्याल की नऊ ते दहा महिने. पण जर का एखादं बाळ जन्माला येताच चालू लागलं असं जर का तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का ? नक्कीच नाही बसणार...हे कसं काय शक्य आहे असं म्हणत तुम्ही समोरच्या व्यक्तीची खिल्ली उडवाल. पण हीच अशक्य गोष्ट शक्य करणारं बाळ सध्या सोशल मीडियावर धुमाकळू घालत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेलं हे बाळं पाहून तुम्ही आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहणार नाही. या व्हिडीओमध्ये नुकतंच जन्मलेलं बाळ नर्स आपल्या हातात उचलून घेतं, आणि थोड्याच वेळात ते बाळ चालू लागतं. व्हिडीओत नर्स मुलाला चालवण्याचा प्रयत्न करते, आणि बाळही तिच्या मदतीने चालू लागतं. ब्राझिलमधला हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
नवजात बाळाचा हा व्हिडीओ एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. फेसबूकवर हा व्हिडीओ व्हायरल होत असून अनेकांनी तो शेअर केला आहे. हा व्हिडीओ 25 मे रोजी ब्राझिलमधून अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत पाच कोटींपेक्षा जास्त जणांना पाहिला असून 13 लाख जणांनी तो शेअर केला आहे.