छोट्या पडद्यापासून बॉलिवूडपर्यंत यशस्वी प्रवास करणाऱ्या सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसला. सुशांतच्या आत्महत्ये मागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांतवर मानसोपचार सुरू होते. त्याबद्दलची काही कागदपत्रदेखील त्याच्या घरात पोलिसांनी सापडली. त्यामुळे नैराश्यातून त्याने टोकाचं पाऊल उचललं असावं, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियावर अनेकांनी सुशांतचा फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
सुशांतच्या निधनाची बातमी समजल्यावर इस्रायलही भावूक झाला आहे. आम्ही सच्चा मित्र गमावला असल्याची भावना इस्रायलने व्यक्त केली आहे. इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाचे उपमहासंचालक गिलाद कोहेन यांनी ट्विटरवर सुशांतच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. गिलाद यांनी सुशांतच्या 'ड्राइव्ह' चित्रपटातील मखना या गाण्याची लिंक शेअर करत त्याला आदरांजली वाहिली आहे. तसेच इस्रायलने सच्चा मित्र असलेल्या सुशांतसिंह राजपूतच्या निधनावर दु:ख व्यक्त करत असल्याचं म्हटलं आहे.
सुशांतची कायम आठवण येणार असल्याचं देखील ट्विटमध्ये सांगितलं आहे. इस्रायलमध्ये सुशांत आणि अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस यांच्या एका गाण्याचे चित्रीकरण करण्यात आले होते. त्यावेळी सुशांत त्याच्या टीमसह तेथे गेला होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. सुशांतने रविवारी सकाळी त्याच्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या घरातून पोलिसांनी कोणतीही सुसाईड नोट मिळालेली नाही. मध्यरात्री त्याने एका अभिनेत्याला शेवटचा फोन केला होता. मात्र त्या अभिनेत्याने फोन उचलला नाही. त्यामुळे दोघांचं बोलणं होऊ शकलं नाही. सुशांतला गेल्या 6 महिन्यांपासून नैराश्याने ग्रासल्याची माहिती पोलिसांनी दिली.
रविवारी सकाळी दहाच्या सुमारास सुशांतनं ज्युस मागवला. त्यानंतर तो त्याच्या खोलीत गेला. सुशांत बराच वेळ बाहेर आला नाही. त्यामुळे त्याच्या मित्रांनी दार उघडण्याचा प्रयत्न केला. पण दरवाजा लॉक होता. अखेर घरातील नोकरांनी चावी तयार करणाऱ्याला बोलावलं. त्यानंतर दार उघडण्यात आलं. त्यावेळी सुशांतचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर नोकरांनी याबद्दलची माहिती पोलिसांना दिली. सुशांतच्या वांद्रे येथील घरात चार जण राहतात. त्यामध्ये दोन आचारी, एक नोकर आणि एका आर्ट डिझायनराचा समावेश आहे. हा आर्ट डिझायनर सुशांतचा मित्र आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : लढ्याला यश! औषध किंवा लस नाही तर आता 'या' थेरेपीने होणार कोरोनाग्रस्तांवर उपचार?
अलर्ट! चीनी अॅपचा वापर करताय?; बसू शकतो मोठा फटका, जाणून घ्या धोका
तब्बल 21 महिने झाले तरी वडिलांनी केले नाहीत मुलावर अंत्यसंस्कार; 'हे' आहे कारण
Today's Fuel Price : इंधन दरवाढीचा भडका! सलग बाराव्या दिवशी पेट्रोल-डिझेल महागले
CoronaVirus News : बापरे! 'या' व्यक्तींसाठी कोरोना ठरतोय जीवघेणा; 12 पट अधिक आहे मृत्यूचा धोका