न्यूयॉर्क- भारत आणि पाकिस्तानमध्ये दिवसेंदिवस तणाव वाढत आहे. त्यामुळे भारतानं पाकिस्तानबरोबरच्या सर्व चर्चा थांबवल्या होत्या. त्यातच पाकिस्तानकडून कायम शस्त्रसंधीचं उल्लंघन होत असल्यानं दोन्ही देशांमध्ये तणाव वाढत चाललाय. याचा प्रत्यय अमेरिकेतल्या न्यूयॉर्कमध्ये आयोजित दक्षिण आशिया क्षेत्रीय सहयोग संघटने(सार्क)च्या बैठकीतही पाहायला मिळालं.खरंतर न्यूयॉर्कमध्ये सार्क देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनीही भाग घेतला होता. परंतु सुषमा स्वराज या भाषण दिल्यानंतर बैठकीतून निघून गेल्या. त्यामुळे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री महमूद कुरेशी यांनी सुषमा स्वराज यांच्या भूमिकबाबत नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे सुषमा स्वराज यांच्यानंतर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री यांचं भाषण होणार होतं. तत्पूर्वीच सुषमा एका कार्यक्रमानिमित्तानं तिथून बाहेर पडल्या. या प्रकारानंतर महमूद कुरेशी यांना राग अनावर झाला.ते म्हणाले, जर शांतीच्या दृष्टिकोनातून चर्चा करायची असल्यास दोन्ही देशांना एक पाऊल पुढे यावे लागेल. परंतु सुषमा स्वराज यांची ही कुठली पद्धत आहे ?, जर सार्क देशांच्या प्रगतीत कोणी बाधा बनत असेल, तर ती एका देशाची भूमिका आहे. तसेच सुषमा स्वराज आणि आमच्यामध्ये कोणतीही चर्चा झालेली नाही. सुषमा स्वराज बैठकीतून निघून गेल्या. कदाचित त्यांची तब्येत ठीक नसावी, मी त्यांचं भाषण ऐकलं, त्यांना क्षेत्रीय सहयोग वाढवायचा आहे. परंतु त्यासाठी एका देशानं दुस-या देशाशी चर्चा करण्याची गरज नाही. त्या देशाला बाजूला करून चर्चा होऊ शकत नाही.
सार्क देशांच्या बैठकीत सुषमा स्वराज यांनी दुर्लक्ष केल्यानं पाकच्या परराष्ट्र मंत्र्यांचा तीळपापड
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 9:58 AM