शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

UNमध्ये पाकिस्तानला फटकाणा-या सुषमा स्वराजांचं भाषण उद्धटपणाचं - चिनी मीडिया 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2017 8:01 AM

संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेत पाकिस्तानवर तीक्ष्ण शब्दांत सुनावणी करणा-या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना चिनी मीडियानं 'उद्धट' असे म्हटले आहे. यावरुन पुन्हा एकदा चीननं पाकिस्तानला समर्थन दिल्याचं दिसत आहे.

बीजिंग, दि. 26 - संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेत पाकिस्तानला तीक्ष्ण शब्दांत फटकारणा-या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना चिनी मीडियानं 'उद्धट' असे म्हटले आहे. यावरुन पुन्हा एकदा चीननं पाकिस्तानला समर्थन दिल्याचं दिसत आहे. चिनी मीडियानं आरोप करत म्हटले की, गेल्या काही वर्षांमध्ये झालेला आर्थिक विकास आणि परदेशी संबंधांवरुन भारत पाकिस्तानला कमी लेखत आहे. या आरोपासोबत चीननं पाकिस्तानातील दहशतवादाची बाबदेखील स्वीकारली आहे. सुषमा स्वराज यांनी दहशतवादाच्या मुद्यावरुन पाकिस्तानला फटकारत म्हटले होते की,  भारतात आयआयटी आणि आयआयएम स्थापन करण्यात आलेत तेथे पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदसारख्या दहशतवादी संघटना तयार करण्यात आल्या. 

सुषमा स्वराज यांच्या या विधानावरुन चीनच्या सरकारी मीडियानं, भारताचा व्यवहार हा पक्षपाती असल्याचा कांगावा केला आहे. चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सच्या संपादकीयमध्ये असे लिहिण्यात आले आहे की, पाकिस्तानात दहशतवाद आहे, मात्र दहशतवादाचे समर्थन करणं हे देशाचे धोरण आहे का? दहशतवादामुळे पाकिस्तानला काय फायदा होणार आहे? पैसा की सन्मान?, असे प्रश्न उपस्थित करत चीननं पुन्हा एकदा पाकिस्तानचं समर्थन केले आहे. 

'इंडियाज बिगट्री नो मॅच फॉर इट्स अॅम्बिशन' असं शीर्षक असलेल्या संपादकीयमध्ये चिनी मीडिया असेही लिहिले आहे की, गेल्या काही वर्षात झालेल्या अर्थ्यव्यवस्थेचा विकास आणि परदेशी संबंधांवरुन भारत पाकिस्तानला कमी लेखत आहे आणि चीनलाही अहंकार दाखवत आहे. यावरुन भारताला असे वाटत आहे की पाकिस्तान आपल्या शेजारील देशाला घाबरेल आणि अमेरिका तसंच युरोपच्या प्रलोभनात अडकेल,असेही चिनी मीडियानं म्हटले आहे.  

नेमकं काय म्हणाल्या होत्या सुषमा स्वराज?आम्ही वैज्ञानिक तयार केले, तुम्ही दहशतवादी आणि जिहादी तयार केले अशा सणसणीत शब्दांत केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला सुनावलं होतं. संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत बोलताना सुषमा स्वराजांनी सडेतोड भाषण करत पाकिस्तानला एकामागोमाग एक चपराक लगावल्या होत्या. यावेळी त्यांनी भारतावर आरोप करणा-या पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खान अब्बासी यांना ज्या देशाने दहशतवाद आणि हिंसेच्या सर्व सीमा पार केल्या आहेत तो देश आम्हाला अहिंसा आणि मानवता शिकवत होता, असा टोलाही लगावला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इतकं सर्व होऊनही शांततेसाठी मैत्रीचा हात पुढे केला होता, पण पुढे काय झालं ते सर्वांना माहित आहे अशी आठवण त्यांनी पाकिस्तानला करुन दिली. सोबतच पाकिस्तानला सर्व लक्षात आहे, पण विसरण्याचं नाटक करत असतात अशी टीका केली. 'भारत आणि पाकिस्तान एकत्र स्वतंत्र झाला, पण कधी तुम्ही एकत्र बसून विचार केला आहे का ? भारताने इतकी प्रगती केली पण दहशतवादी देश म्हणून आपली ओळख निर्माण का झाली हा विचार पाकिस्तानने कधी केला आहे का ? असा सवाल सुषमा स्वराजांनी विचारला होता. पाकिस्तानला तोंड देताना आम्ही देशाच्या विकासात कोणतीही हयगय केली नाही असं सुषमा स्वराजांना ठामपणे सांगितलं. आम्ही आयआयटी उभारले पण तुम्ही लष्कर-ए-तोयबा, हिजबूल मुजाहिद्दीन, हक्कानी बनवलं. आम्ही वैज्ञानिक तयार केले, आणि तुम्ही दहशतवादी आणि जिहादी तयार केले अशा शब्दांत सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला सुनावलं होते. जो पैसा तुम्ही दहशतवाद्यांसाठी खर्च करत आहात तो पैसा देशाच्या नागरिकांसाठी वापरलात तर तुमच्या लोकांचं भलं होईल, त्यांचा विकास होईल असा सल्लाच सुषमा स्वराजांनी दिल होता. यावेळी त्यांनी संयुक्त राष्ट्रांना दहशतवाद ही आपली प्रमुख समस्या आहे. त्याच्याविरोधात लढण्यासाठी आपण एकजूट झालो पाहिजे. वेगवेगळ्या नजरेने दहशतवादाकडे पाहणं थांबवलं पाहिजे असं आवाहनही केलं होतं. 

टॅग्स :Terrorismदहशतवाद