इस्लामाबादपाकिस्तानातील महिलांवरील अत्याचारांविरोधात आवाज उठवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या करीमा बलोच यांचा मृतदेह कॅनडामध्ये सापडला आहे. बलोच यांच्या संशयास्पद मृत्यूनं खळबळ उडाली आहे. करीमा बलोच या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाऊ मानत होत्या.
कॅनेडियन पत्रकार तारेक फतेह हेच बलोच यांच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे. कॅनडामध्ये वास्तव्याला असलेल्या करीम बलोच गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता होत्या. विशेष म्हणजे, २०१६ साली जगातील सर्वात प्रभावशाली १०० महिलांच्या यादीत करीम बलोच यांचं नाव समाविष्ट करण्यात आलं होतं. संयुक्त राष्टासमोर त्यांनी पाकिस्तानमधील अत्याचारांविरोधात आवाज उठवला होता.
करीमा बलोच यांनी एकदा एका मुलाखतीमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाऊ मानत असल्याचं म्हटलं होतं. इतकंच नव्हे, तर रक्षाबंधनच्या दिवशी बलोच यांनी ट्विटरवर राखी शेअर करत मोदींकडे मागणी केली होती. बलुचिस्तानमधील सर्वच महिलांना मोदींकडून खूप अपेक्षा आहेत, असं त्या म्हणाल्या होत्या. पंतप्रधान मोदींनी आंतरराष्ट्रीय परिषदेत मानवाधिकाराच्या उल्लंघनाविरोधात आवाज उठवावा, असं आवाहन बलोच यांनी केलं होतं.