शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
2
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
3
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
4
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
5
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
6
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
7
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
8
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
9
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
10
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
11
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
12
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
13
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
14
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
15
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
16
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
17
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
18
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
19
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
20
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'

संशयास्पद! कतारच्या प्रिन्सची एक्स पत्नी कासिया गॅलानियो मृतावस्थेत आढळली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2022 7:37 PM

Qatari Princess Kasia Gallanio death case : तिने आरोप केला होता की, आधीच्या पतीने एका अल्पवयीन मुलासोबत अयोग्यरित्या स्पर्श केला होता.

कतार कतारचा प्रिन्स अब्दुल अजीज बिन खलीफा अल थानी (Abdelaziz bin Khalifa Al-Thani) याची एक्स पत्नी कासिया गॅलानियो हिच्या संशयास्पद मृत्यूमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. तिने आरोप केला होता की, आधीच्या पतीने एका अल्पवयीन मुलासोबत अयोग्यरित्या स्पर्श केला होता.

कतारचे राजकुमार अब्दुल अझीझ बिन खलिफा अल-थानी यांची तिसरी पत्नी कासिया गॅलानियो ही तिच्या स्पेनच्या घरी मृतावस्थेत आढळून आली आहे. हे हायप्रोफाईल प्रकरण असल्याने पोलीस आता या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

फ्रेंच वृत्तपत्र Le Parisienमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, गॅलानियोचा मृत्यू अमली पदार्थाच्या अतिसेवनामुळे  झाला. त्याचवेळी तिच्या संशयास्पद मृत्यूच्या वेळेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. गॅलानियो  45 वर्षांची होती, तिच्यावर तिच्या अगोदरच्या पतीकडून मुलांचा ताबा घेण्याचा खटला सुरु होता. 

कुटुंबीयांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिने बराच वेळ फोन उचलला नाही, तेव्हा पोलिसांना कळवण्यात आले. यानंतर पोलिसांचे पथक  मार्बेला येथील अपार्टमेंटमध्ये पोहोचले. तेव्हा गॅलानियो हिचा मृतदेह बेडवर पडलेला आढळून आला. पोलिसांनी सांगितले की, 'प्राथमिक तपासात मृत्यूचे कारण अमली पदार्थाचे अतिसेवन असल्याचे दिसते. शवविच्छेदनानंतरच अधिक माहिती समोर येईल.

गॅलानियो हिचा मृत्यू अशा वेळी झाला, जेव्हा तिने अलीकडेच तिच्या अगोदरच्या पतीवर एका अल्पवयीन मुलाला अयोग्यरित्या स्पर्श केल्याचा आरोप केला. मात्र, प्रिन्स अब्दुल अजीज बिन खलिफा यांनी हा आरोप निराधार आणि खोटा असल्याचे  सांगत फेटाळून लावला होता.  गॅलानियो हिला १७ वर्षांच्या दोन जुळ्या मुली आहेत. पूर्वी त्यांच्या मुली त्यांच्या वडिलांच्या घरी राहत होत्या. मात्र, नंतर त्या आपल्या आईकडे राहण्यास आल्या. रिपोर्ट्सनुसार, गॅलानियो नैराश्याने ग्रस्त होता आणि दारूच्या व्यसनाशी झुंजत होता. मार्बेलातील गॅलानियोचा मित्र लुई स्पॅग्नुओलो, स्पॅनिश वृत्तपत्र ऑलिव्ह प्रेसशी बोलला, "तिच्या मुलींवर विश्वासापेक्षा जास्त प्रेम होते आणि ती त्यांना कधीही सोडणार नाही." त्याने असेही म्हटले की, "तिचा मृत्यू अमली पदार्थामुळे झाला आणि कधीही मद्यपी नव्हती".

टॅग्स :Deathमृत्यूQatarकतारPoliceपोलिसDrugsअमली पदार्थ