स्कॉटहोम : पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच दिवसांच्या परदेश दौऱ्यावर आहेत. सोमवारी उशिरा रात्री ते स्वीडन येथे दाखल झाले आहेत. यावेळी त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लॉवेन यांनी पंतप्रधान मोदी यांचे विमानतळावर स्वागत केले. यावेळी पंतप्रधानांनी तेथील भारतीय नागरिकांचीही भेट घेतली. आज पंतप्रधान मोदी अनेक बैठकांमध्ये सहभागी होणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यापार आणि गुंतवणुकीसह अनेक महत्त्वपूर्ण क्षेत्रांत द्विपक्षीय सहकार्य बळकट करण्यावर भर देतील. देशवापसी करताना 20 एप्रिलला पंतप्रधान मोदी बर्लिन येथे काही वेळासाठी थांबवणार आहेत.
या दौऱ्याबाबत पंतप्रधान मोदी यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'भारत आणि स्वीडनमध्ये मैत्रीचे नाते आहे. आमच्यातील भागीदारी लोकशाही मूल्यं तसेच खुल्या, सर्वसमावेश आणि नियमांच्या आधारावर आधारित आहे. विकासाच्या बाबतीत स्वीडन हा एक महत्त्वपूर्ण भागीदार आहे. ''