एका ग्राहकाने रेस्टॉरंटमध्ये जेवण केलं. मात्र बिल दिल्यानंतर तो पाकिट तिथेच विसरला. पाकिटमध्ये 2 लाखांहून अधिक रुपये होते. हे पाकिट एका स्वच्छता कर्मचाऱ्याच्या नजरेस पडताच त्याने प्रामाणिकपणा दाखवत ते पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र यामुळे रेस्टॉरंटचा मॅनेजर संतप्त झाला आणि त्याने स्वच्छता कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकलं. आता सोशल मीडियावर या प्रामाणिक स्वच्छता कर्मचाऱ्यासाठी लोक आवाज उठवत आहेत. चीनमध्ये ही घटना घडली आहे.
साउथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, लियाओनिंग प्रांतातील एका रेस्टॉरंटमध्ये एक ग्राहक 2,35,000 रुपये रेस्टॉरंटमध्ये विसरला होता. सांग नावाच्या एका कर्मचाऱ्याच्या नजरेवर पडल्यावर त्याने रेस्टॉरंटच्या व्यवस्थापकाला याची माहिती दिली आणि स्थानिक पोलिसांना या प्रकरणाची तक्रार करण्याची सूचना केली. पण मॅनेजरने त्याला खडसावले आणि स्वतःचं काम करण्याचा सल्ला दिला.
सांगला वाटले की, मॅनेजरचा पैसे परत करण्याचा कोणताही हेतू नाही. अशा स्थितीत त्याने स्वतः पोलिसांना याबाबत माहिती दिली. याचा राग आल्याने मॅनेजरने सांगला नोकरीवरून काढून टाकले. रेस्टॉरंट मॅनेजरने सांगला सांगितले की त्याने हे प्रकरण त्याच्या थेट मॅनेजरकडे नेले पाहिजे ज्याने त्याला कामावर ठेवले आहे. मॅनेजर म्हणाला - जर तुमच्या बॉसला मी पोलिसांना बोलवावे असे वाटत असेल तर मी करेन. या प्रकरणाचा तुमच्याशी काही संबंध नाही.
सांगची ही गोष्ट समोर आल्यानंतर सोशल मीडियावर लोक त्याचे कौतुक करत आहेत. स्थानिक अधिकाऱ्यांनीही त्यांचे कौतुक केले आहे. एवढेच नाही तर ते त्याला नवीन नोकरी शोधण्यात मदत करत आहेत. एका चिनी यूजरने कमेंटमध्ये लिहिले - सांगला प्रामाणिकपणाची शिक्षा झाली. दुसऱ्याने लिहिले - त्याला बक्षीस मिळायला हवे. तिसरा म्हणाला - सत्यासाठी आपली नोकरी पणाला लावली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"