शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 
3
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
4
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
5
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
6
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
7
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
8
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
9
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
10
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
11
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
12
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
13
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
14
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
15
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
16
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
17
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
18
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
19
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
20
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू

Swiss Bank: जगभरात मोठी खळबळ! स्विस बँकेतील १८ हजार खात्यांचा डेटा लिक, १६० पत्रकारांनी केली छाननी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 14:20 IST

Credit Suisse Data Leak: बर्फानं आच्छादलेलं सुंदर दृश्य, आलिशान कार आणि सर्वोत्तम चॉकलेट्स अशी स्वित्झर्लंडची ओळख आहे. पण यासोबतच हा देश सीक्रेट बँक सिस्टमसाठी देखील ओळखला जातो.

Credit Suisse Data Leak: बर्फानं आच्छादलेलं सुंदर दृश्य, आलिशान कार आणि सर्वोत्तम चॉकलेट्स अशी स्वित्झर्लंडची ओळख आहे. पण यासोबतच हा देश सीक्रेट बँक सिस्टमसाठी देखील ओळखला जातो. स्विस बँकेतील खातेधारकांची यादी नेहमीच चर्चेत असते. Credit Suisse नावाची बँकिंग सिस्टम सर्वात महत्वाच्या प्लेअर्सपैकी एक आहे. जगातील सर्वात महत्वपूर्ण आर्थिक संस्थांमध्ये याची गणना होते. या संस्थेला १६६ वर्षांचा इतिहास आहे. 

क्रेडिट सुइसमध्ये जवळपास ५० हजाराहून अधिक कर्मचारी काम करतात. तर बँकेच्या ग्राहकांची संख्या १५ लाख इतकी आहे. क्रेडिट सुइस स्वित्झर्लंडमधील दुसरी सर्वात मोठी बँक आहे. याच बँकेच्या खातेधारकांची एक अशी यादी समोर आली आहे की ज्यामुळे संपूर्ण जगभरात खळबळ उडाली आहे. 

खातेधारकांची यादी माध्यमांमध्ये लिकस्विस बँकेतील जगभरातील दिग्गजांची खाती असल्याची माहिती अनेकदा समोर आली आहे. यादरम्यान जर्मनीतील एका वृत्तपत्र Süddeutsche Zeitung आणि Organized Crime and Corruption Reporting Project (OCCRP) च्या संयुक्त संशोधन अहवालातून अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे. 

एका व्यक्तीनं १९४० सालापासून ते २०१० पर्यंतच्या खातेधारकांची महत्वाची माहिती जर्मनीच्या वृत्तपत्रासोबत कथित पद्धतीनं लिक केली आहे. याच पब्लिकेशननं न्यूयॉर्क टाइम्ससह ४६ इतर वृत्त माध्यमांच्या समूहांना देखील ही माहिती दिली आहे. यात परदेशी ग्राहकांच्या एकूण १८ हजार बँक खात्यांची माहिती यात देण्यात आली आहे. यामाध्यमातून स्विस बँकेशी निगडीत अनेक व्यवहारांची पोलखोल झाली आहे. 

१६० पत्रकारांनी केली छाननीOCCRP च्या अहवालानुसार एकूण १६० पत्रकारांनी स्विस बँकेतील माहितीची अनेक महिने छाननी केल्यानंतर काही खळबळजनक माहिती समोर आली आहे. यात डझनभर भ्रष्ट राजकीय नेते, गुन्हेगार, गुप्तहेर, हुकूमशाह आणि इतर संशयितांच्या बँक खात्यांची माहिती मिळाली आहे. एकूण १८ हजार बँक खात्यांमध्ये एकूण मिळून ८ बिलियन डॉलर इतकी रक्कम जमा होती आणि बऱ्याच कालावधीपर्यंत ही सारी खाती सक्रिय देखील होती. 

टॅग्स :Swiss Bankस्विस बँकSwitzerlandस्वित्झर्लंडblack moneyब्लॅक मनीIndiaभारत