शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
2
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
3
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
4
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
5
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
6
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
8
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
9
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
10
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
11
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
12
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
13
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
14
लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
15
राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत आणली तिजोरी, आतून काढली दोन पोस्टर्स अन् म्हणाले...
16
विदेशी वित्तसंस्थांच्या विक्रीचा मारा थांबणार कधी? अमेरिकेची बेरोजगारी, जपानच्या चलनवाढीकडे लक्ष
17
Maharashtra Election 2024 Live Updates: मतदानाच्या अवघ्या दोन दिवस आधी अजित पवार गटाचा मोठा निर्णय, खेळी फिरणार?
18
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
19
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
20
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा

व्यवहार न झालेल्या खात्यांचा तपशील जाहीर करणार स्वीस बँक

By admin | Published: October 04, 2015 11:41 PM

भारतासहित इतर देशांच्या व्यक्तींची अशी अनेक बँक खाती आहेत ज्यावर ६० वर्षांत व्यवहारच झाला नाही. अशा बँक खात्यांची माहिती स्वीस बँक डिसेंबरमध्ये देणार आहे.

झ्युरीच : भारतासहित इतर देशांच्या व्यक्तींची अशी अनेक बँक खाती आहेत ज्यावर ६० वर्षांत व्यवहारच झाला नाही. अशा बँक खात्यांची माहिती स्वीस बँक डिसेंबरमध्ये देणार आहे.स्वीस बँक प्रथमच अशा प्रकारची माहिती देत असून, १९५५ पासून व्यवहार न झालेली अशी अनेक खाती आहेत. त्या खातेदारांशी संपर्क साधण्यातही आतापर्यंत स्वीस बँकेला यश आलेले नाही. या पार्श्वभूमीवर अशा खातेदारांची माहिती संकलित करण्यात आली आहे. यात भारतासहित अन्य देशांंतील खात्यांचा समावेश आहे.याबाबत असे तर्कवितर्क केले जात आहेत की, तत्कालिक राजा-महाराजांचीही यात खाती असू शकतात. ज्यांनी आपल्या खात्यामध्ये वारसदारांचा उल्लेख केलेला नाही. परिणामी, ही रक्कम पडून आहे. काही कथित वारसदारांनी या खात्यांबाबत दावा केला होता; परंतु हे वारसदार सबळ पुरावे देऊ शकले नाहीत.तथापि, स्वीस बँकेने अद्यापपर्यंत अशा कुठल्याही खातेदाराचे अथवा देशाचे नाव अधिकृतपणे जाहीर केलेले नाही. स्वीस बँकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे की, या यादीमध्ये काही भारतीय नागरिकांची नावे आहेत. मात्र, डिसेंबर २०१५ मध्ये पूर्ण यादीच प्रसिद्ध केली जाणार असून, त्यासोबत भारतीयांची नावेही प्रसिद्ध होतील, असे या अधिकाऱ्याने सांगितले. यादी प्रसिद्ध करताना खातेदाराचे प्रथम नाव, आडनाव, जन्मतारीख, राष्ट्रीयत्व याचा समावेश असेल, असे सांगण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)स्वीस बँकेने यावर्षी नियमांमध्ये काही बदल केले आहेत. त्यानुसार जी खाती ६० वर्षांपासून बंद आहेत त्यांची माहिती प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तथापि, त्यानंतर आलेल्या दाव्यांमध्ये नियमांनुसार तथ्य आढळले नाही तर ही संपत्ती स्वीस संघाकडे हस्तांतरित करण्यात येईल.