वॉशिंग्टन : बी व्हिटामिनमुळे स्कीझोफ्रेनिया या मानसिक आजाराची लक्षणे कमी होतात असा दावा करण्यात आला आहे. अशा व्यक्तींना बी ६, बी ८ आणि बी १२ व्हिटामिन अधिक प्रमाणात दिल्यास त्यांच्या लक्षणात घट दिसून येते. मॅनचेस्टर विद्यापीठातील जोसेफ फर्थ यांनी हे संशोधन केले आहे. या आजारात व्यक्ती वास्तविक आणि काल्पनिक यातील फरक समजून घेत नाही. काही रुग्णांवर बी व्हिटामिनचा सकारात्मक परिणाम दिसून आल्याचे जोसेफ यांनी म्हटले आहे. या तपासात ८३२ रुग्णांवर याची चाचणी घेण्यात आली. अर्थात, हा दावा करण्यात येत असला तरी याबाबत संशोधकात मतभेद आहेत.
बी व्हिटामिनमुळे कमी होतील स्कीझोफ्रेनियाची लक्षणे
By admin | Published: February 22, 2017 12:53 AM