लंडन - सर्वसाधारणपणे व्यक्तीची वृद्धावस्था ही अनुवांशिक आणि लाईफस्टाईलवर अवलंबून असते. वाढत्या वयासोबत व्यक्तीला येणारा थकवासुद्धा वाढू लागतो. मात्र नव्याने झालेल्या संशोधनानुसार थकवा हा एखाद्या व्यक्तीच्या अकाली म्हणजेच वेळेपूर्वी होणाऱ्या मृत्यूचा संकेत असून शकतो. जर्नल ऑफ ग्रोन्टोलॉजी: मेडिकल सायन्सेस मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार तणावामुळे होणारा मानसिक आणि शारीरिक थकवा व्यक्तीच्या लवकर होणाऱ्या मृत्यूचे संकेत देऊ शकते. या संशोधनासाठी ६० वर्षे किंवा यापेक्षा अधिक वयाच्या २ हजार ९०६ सॅम्पल्सची चाचणी करण्यात आली. या संशोधनात सहभागी झालेल्या स्वयंसेवकांना संशोधकांनी काही अॅक्टिव्हिटीच्या आधारावर एकपासून पाचपर्यंतच्या स्केलवर थकव्याचा स्तर विचारला होता.
यामध्ये ३० मिनिटांचे चालणे, हलके घरकाम आणि बागकामासारख्या कामांचा समावेश करण्यात आला होता. मृत्युदरावर परिणाण करणाऱ्या सर्व घटकांचा विचार केल्यानंत संशोधकांनी पाहिले की, या सर्व कार्यामध्ये सहभागी झालेल्या ज्या स्वयंसेवकांना अधिक थकवा जाणवला, त्यांच्यामद्ये आकस्मिक मृत्यूचा धोका अधिक दिसून आला. त्यासाठी डिप्रेशन, आधीपासून असलेला कुठला तरी असाध्य आजार, वय आणि लिंग यासारख्या घटकांनी परिणाम केले.
पिट्स ग्रॅज्युएट स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या एपिडेमायोलॉजी डिपार्टमेंटमध्ये असोसिएट्स प्राध्यापक आणि संशोधनाचे प्रमुख लेखक नॅन्सी डब्ल्यू ग्लिन यांनी सांगितले की, ही अशी वेळ आहे जेव्हा लोक अधिकाधिक फिजिकली फिट राहण्यासाठी नववर्षावेळी नवनवे संकल्प करत आहेत. मला अपेक्षाआहे की, आमचे आकडे लोकांना व्यायामाचे महत्त्व समजावून देण्यात मदत करतील.
एका मागच्या संशोधनामध्ये याबाबतचे संकेत मिळत होते की, ज्यात अधिक फिजिकली अॅक्टिव्ह राहिल्यामुळे व्यक्तीच्या आत थकव्याचा स्तर कमी होऊ शकतो. तर आमचे पहिले असे अध्ययन आहे. ज्यामध्ये अधिक गंभीर शारीरिक थकव्याला अकाली मृत्यूशी जोडण्यात आले आहे. स्केलवर लोअर स्कोट व्यक्तीच्या अधिक उर्जावान आणि दीर्षायुष्याकडे इशारा करतो. याआधीच्या एका संशोधनानुसार दररोजची नियमित १५ मिनिटांची शारीरिक कसरत व्यक्तीच्या जीवनातील तीन वर्षे वाढवत असते.