बैरूत : इस्लामिक स्टेटच्या अतिरेक्यांनी उत्तरपूर्व सिरियातील तबका हा हवाईतळ सरकारी फौजांच्या ताब्यातून रविवारी अखेर हिसकावून घेतला. या संघर्षात इस्लामिक स्टेट व सिरियाचे जवान मिळून किमान ५४२ जण ठार झाले आहेत.सिरियातील मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या निरीक्षक यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार १९ आॅगस्टपासून हे अतिरेकी तबका हा तळ ताब्यात घेण्यासाठी सरकारी फौजांशी संघर्ष करीत होते. त्यात इस्लामिक स्टेटचे ३४६ जण, तर १७६ सरकारी जवान ठार झाले. सिरियात इस्लामिक स्टेटच्या अतिरेक्यांनी सुरू केलेल्या युद्धातील ही सर्वात मोठी जीवित हानी आहे. सिरियाच्या ताब्यात असलेला या भागातील हा एकमेव हवाई तळ होता. (वृत्तसंस्था)
सिरियाचा हवाईतळ इस्लामिक स्टेटकडे
By admin | Published: August 25, 2014 11:56 PM