ऑनलाइन लोकमत
तैनान (तैवान), दि. ९ - शनिवारच्या भूकंपामध्ये तैवानमध्ये इमारत कोसळून ३९ जणांना प्राण गमवावे लागले होते. या इमारतीच्या विकासकाला अटक करण्याचे आदेश देण्यात आल्याचे वृत्त स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिले आहे.
शनिवारी पहाटे तैवानला भूकंपाचा धक्का बसला. तैवानसाठी नव्या वर्षाचा उदय होणार होता आणि ही दुर्घटना घडली. यावेळी तैनानमधली वी गुआन गोल्डन ड्रॅगन ही १७ मजली इमारत भूकंपाचा धक्का न सोसल्याने कोसळली आणि ३७ जणांचा मृत्यू झाला, तर अन्य ठिकाणी २ जणठार झाले.
त्यानंतर या इमारतीच्या बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले. अद्यापही जवळपास १०० जण गाडले गेले असावेत असा कयास असून बचावकार्य सुरू आहे.
याप्रकरणी बांधकामाचा दर्जा व वापरण्यात आलेले साहित्य यांच्याबाबत शंका उपस्थित केल्या जात असून इमारतीचा विकासक आणि अन्य दोघांविरोधात शहर प्रशासनाचे डेप्युटी गव्हर्नर जनरल लिउ शी चुंग यांनी अटक वॉरंट बजावले आहे.