तैपेई - अमेरिकेचे आरोग्यमंत्री एलेक्स अजार यांच्या नेतृत्वात रविवारी एका टीम तैवानला भेट दिली. अमेरिका आणि तैवान यांचे 1979 मध्ये औपचारिक द्विपक्षीय संबंध संपल्यानंतर, एखाद्या अमेरिकन मंत्र्याने तैवानला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. चीनने यापूर्वीच अजार यांच्या या भेटीसंदर्भात विरोध दर्शवला आहे. तसेच ही भेट म्हणजे विश्वासघात असल्याचेही चीनने म्हटलं आहे. त्यामुळेच संतापलेल्या चीनने तैवानच्या हवाई हद्दीत घुसखोरी केली.
चीनच्या लढाऊ विमानांनी हवाई हद्दीत घुसखोरी केली मात्र तैवानने मिसाईल डागलेली पाहून चिनी वैमानिक पळून गेल्याची माहिती मिळत आहे. जवळपास चार दशकानंतर अमेरिकेचे मंत्री तैवानच्या दौऱ्यावर आले आहेत. मंत्र्याच्या या दौऱ्याचा चीनने निषेध केला असून चीन सतत तैवानवर अधिकाराचा दावा करत आहे. सोमवारी, अमेरिकेचे आरोग्य मंत्री अजार आणि तैवानचे राष्ट्रपती साई इंग-वेन यांच्या भेटीच्या आधी चीनने घुसखोरी केल्याची माहिती मिळत आहे.
तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास चीनची शेनयांग जे-11 आणि चेंगदू जे-10 ही लढाऊ विमानांनी तैवानच्या हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. घुसखोरी केल्यानंतर तैवान हवाई दलाने चीनच्या लढाऊ विमानांवर अँटी एअरक्राफ्ट मिसाईल डागले. यासोबत गस्त घालणाऱ्या तैवानच्या लढाऊ विमानांनी चिनी विमानांचा पाठलाग केला. तैवानच्या या आक्रमक प्रतिकारानंतर चिनी विमाने पळून गेली आहेत.
चीन सातत्याने तैवानला आपली ताकद दाखवण्याच प्रयत्न करत आहे. 2016 पासून आतापर्यंत अनेकदा चिनी लढाऊ विमानांनी तैवानच्या हवाई हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी समन्वयाच्या दृष्टीने अजार तैवानच्या राष्ट्रपती साई इंग-वेन आणि आरोग्य अधिकाऱ्यांची भेट घेतील. अजार तीन दिवसांच्या तैवान दौऱ्यावर आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
शिकागोमध्ये हजारो लोकांनी केली लूटमार; 100 जणांना अटक, 13 अधिकारी जखमी
"देशाची साधनसंपत्ती लुटणाऱ्या मित्रांसाठी भाजपा काय करत आली याचं 'हे' भयंकर उदाहरण"
कोरोनाच्या संकटात रेल्वे देणार 5000 हून अधिक नोकऱ्या?, जाणून घ्या 'त्या' जाहिरातीमागचं सत्य
CoronaVirus News : कोरोनावर मात केल्यावर शिवराज सिंह चौहान करणार प्लाझ्मादान
शाळेच्या 50 मीटर परिसरात जंक फूडच्या विक्रीला बंदी, FSSAI चा मोठा निर्णय
शाब्बास पोरी! सर्व विषयात जबरदस्त गुण पण गणितात मात्र 2, पुनर्तपासणीत मिळाले पैकीच्या पैकी