शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

'कब्जा केला तर संपूर्ण आशियात विनाश होईल', तैवानचा चीनला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2021 4:53 PM

Tsai Ing-wen : विशेष म्हणजे साई इंग-वेन यांचे हे भाष्य अशा वेळी आले आहे, जेव्हा चीन तैवानवर प्रचंड दबाव आणत आहे.

चीन आणि तैवान यांच्यामधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. 1 ऑक्टोबर रोजी चीनने आपला राष्ट्रीय दिन साजरा केला आणि आपल्या लष्करी सामर्थ्याच्या प्रदर्शनात चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने तैवानच्या संरक्षण हवाई क्षेत्रामध्ये 38 लढाऊ विमानांचे उड्डाण केले होते. आता या प्रकरणी तैवानच्या राष्ट्राध्यक्ष साई इंग-वेन (Tsai Ing-wen) यांनी चीनला इशारा दिला आहे. (taiwan president talks about the chinese incursions and said that it will be catastrophic for asia)

जर चीनने तैवानवर कब्जा केला तर त्याचे संपूर्ण आशियामध्ये भयंकर आणि विनाशकारी परिणाम होतील, असे साई इंग-वेन यांनी म्हटले आहे. दरम्यान, तैवानच्या राष्ट्राध्यक्षांनी यासंदर्भातील एक लेख परराष्ट्र व्यवहार मासिकात लिहिला आहे. त्या म्हणाल्या की,  तैवानला लष्करी संघर्ष नको आहे, परंतु तैवान स्वतःचे संरक्षण करण्यासाठी जे काही करावे लागेल ते करणे चुकवणार नाही.

विशेष म्हणजे साई इंग-वेन यांचे हे भाष्य अशा वेळी आले आहे, जेव्हा चीन तैवानवर प्रचंड दबाव आणत आहे. तैवान स्वतःला एक स्वशासित लोकशाही बेट मानतो, पण चीन म्हणते की, तैवान हा त्याचाच एक भाग आहे. तसेच, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनीही म्हटले आहे की, तैवानला चीनने निश्चितपणे जोडले जाईल.

दरम्यान,  चीनच्या राष्ट्रीय दिनी, 38 लढाऊ विमाने शुक्रवारी तैवानच्या हवाई हद्दीवरून दोनदा उड्डाण केली आणि चीनने आतापर्यंतचे हे सर्वात मोठे अतिक्रमण असल्याचे वर्णन केले. तैवानमध्ये 2016 च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर चीनने या भागात लष्करी, मुत्सद्दी आणि आर्थिक दबाव वाढवला आहे, कारण साई इंग-वेन या निवडणूक जिंकल्यानंतर तैवानला एक स्वतंत्र राष्ट्र मानत आहे. त्यांनी तैवान हा चीनचा भाग नाही, असे वारंवार सांगितले गेले आहे.

विशेष म्हणजे, महासत्ता असूनही चीन क्युबापेक्षा लहान असलेल्या तैवानवर लष्करी हल्ला करू शकलेला नाही. चीनपासून फक्त 180 किमी अंतरावर तैवानची भाषा आणि पूर्वज चीनी आहेत, परंतु तेथील राजकीय व्यवस्था अगदी वेगळी आहे. मात्र, चीन आपली लष्करी क्षमता दाखवून तैवानवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे.

टॅग्स :chinaचीन