बीजिंग : चीनमध्ये सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या ९५ व्या वर्धापनदिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी तैवानच्या स्वातंत्र्यास विरोध दर्शविला असतानाच तैवानी युद्धनौकेने चीनच्या दिशेने चुकून एक जहाजभेदी सुपरसोनिक क्षेपणास्त्र सोडले. तैवानचे राष्ट्राध्यक्ष साई इंग वेन हे परदेशात असताना ही घटना घडली. वेंग हे तैवानच्या लष्कराचे सर्वोच्च कमांडरही आहेत. स्वदेशी बनावटीचे सिउंग फेंग ३ हे जहाजभेदी क्षेपणास्त्र काउशुंग येथील नौदल तळावरून सोडण्यात आले. हा प्रकार चुकून घडला. आम्ही प्रकरणाची चौकशी करीत आहोत, असे तैवानी नौदलाचे व्हाईस अॅडमिरल मेई चिया सू यांनी हाँगकाँगच्या साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट या वृत्तपत्राला सांगितले. या घटनेमुळे चीनचा गैरसमज होण्याची शक्यता आहे काय, असा सवाल केला असता मेई म्हणाले की, नौदलाने घटनेची माहिती तैवानी संरक्षण मंत्रालयाला दिली असून, मंत्रालय आपल्या स्तरावर हा मुद्दा सोडवेल. ३०० कि.मी.पर्यंत मारा करण्याची क्षमता असलेल्या या क्षेपणास्त्राने पेंघू बेटाजवळ समुद्रात कोसळण्यापूर्वी ७५ कि.मी.चे अंतर पार केले. मेई म्हणाले की, तैवानच्या क्षेपणास्त्राने तैवान सामुद्रधुनीचा मध्यभाग ओलांडला नाही. यावरून हे स्पष्ट होते की, क्षेपणास्त्राचे लक्ष्य चीनचा फुजियान प्रांत नव्हता. हा प्रांत सामुद्रधुनीच्या दुसऱ्या बाजूला आहे. चिनचियांग : पीसीजी -६१० गस्ती जहाजाचे ड्रील इन्स्पेक्शन सुरू होते, तेव्हा अधिकाऱ्यांना प्रक्रियेचे पालन न करता आल्याने चुकून क्षेपणास्त्र सुटले. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, असेही त्यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)३०० कि.मी.पर्यंत मारा करण्याची क्षमता असलेल्या या क्षेपणास्त्राने पेंघू बेटाजवळ समुद्रात कोसळण्यापूर्वी ७५ कि.मी.चे अंतर पार केले. मेई म्हणाले की, तैवानच्या क्षेपणास्त्राने तैवान सामुद्रधुनीचा मध्यभाग ओलांडला नाही. यावरून हे स्पष्ट होते की, क्षेपणास्त्राचे लक्ष्य चीनचा फुजियान प्रांत नव्हता.
तैवानचा चीनवर चुकून ‘हल्ला’
By admin | Published: July 02, 2016 6:12 AM