चिनी गुंतवणूकदारांना आवाहन : भारत-चीन कंपन्यांत २२ अब्ज डॉलरचे २६ करारशांघाय : तीन दिवसांचा दौरा आटोपून मंगोलियाकडे रवाना होण्यापूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांघाय येथे चीनमधील २२ अग्रणी कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी (सीईओ) संवाद साधून चिनी गुंतवणूकदारांना भारतातील बदललेल्या स्थितीचा फायदा घेण्याचे आवाहन केले. एवढेच नाहीतर यावेळी भारत आणि चिनी कंपन्यांदरम्यान २२ अब्ज डॉलरचे २६ करारही झाले. फुदान विद्यापीठातील महात्मा गांधी अध्यासनाचे उद्घाटन करून त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले. भारतीय समुदायापुढे बोलताना त्यांनी माझ्या हातून देशाचे नुकसान करणारी चूक घडू नये, यासाठी आर्शीवादही मागितले.इंडिया-चायना बिझनेस फोरमच्या वतीने आयोजित कार्यक्रमात अलिबाबा ग्रुपचे चेअरमन जॅक मा यांच्यासह चीनमधील २२ अग्रणी कंपन्यांचे सीईओ उपस्थित होते. पारदर्शकता, प्रतिसादात्मकता आणि स्थिर नियमावलीसह भारतातील व्यावसायिकदृष्ट्या वातावरणात बदल होत आहे. याचा चिनी गुंतवणूकदारांनी जरूर फायदा घेऊन ‘मेक इन इंडिया’साठी गुंतवणुकीचे आवाहन केले. तत्पूर्वी, मोदी यांनी चीनमधील २२ अग्रणी कंपन्यांच्या प्रमुखांशी चर्चा केली. यात अलिबाबा ग्रुप, चायना लाईट अँड पॉवर, शियाओमी, हुवेई आणि त्रिना सोलरच्या सीईओंचा समावेश होता. यावेळी भारतातील अदानी समूह आणि भारती एअरटेल लिमेटडने चिनी कंपन्यांसोबत तीन करार केले. यावेळी नवीनीकरण ऊर्जा, विद्युत पायाभूत क्षेत्र, पोलाद आणि लघु-मध्यम उद्योगांसह २२ अब्ज डॉलरचे २६ करार करण्यात आले.च्अथक काम करणे गुन्हा असेल, तर मी हा गुन्हा करीत राहीन, अशा स्पष्ट शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी विदेश दौऱ्यावरून विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतला. गेल्या वर्षभरातील सरकारच्या कामगिरीचा प्रत्येकाला गर्व वाटत असल्याचे सांगितले. आज जग भारताकडे वेगळ्या नजरेने पाहत आहे, हे सरकारच्या कामगिरीमुळे घडल्याचे सांगत चीनमधील भारतीय समुदायाला भारताच्या विकासात भागीदार होण्याचे आवाहन केले.च्चीनच्या तीन दिवसांच्या दौऱ्याच्या शेवटी त्यांनी शांघाय येथे भारतीय समुदायाला मार्गदर्शन केले. अमेरिकेतील मेडीसन स्क्वेयर येथे आयोजित कार्यक्रमाप्रमाणे शांघाय येथील मोदी यांच्या स्वागत समारंभाला चीनमधील ५ हजारांहून अधिक भारतीय उपस्थित होते.फुदान विद्यापीठात गांधीवादी अध्यासनाचा शुभारंभच्गरिबी दूर करून अवघ्या जगाच्या कल्याणासाठी भारत आणि चीन प्रगतीचे नवीन शिखर गाठू शकतात, असा आशावाद व्यक्त करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत -चीन दरम्यानच्या सहकार्यपूर्ण संबंधाचे महत्त्व अधोरेखित केले.च्फुदान विद्यापीठातील गांधीवादी आणि भारतीय अध्यासनाच्या उद्घाटनानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना भारत-चीनदरम्यानचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध परस्पर हितासोबत मानवता आणि जगाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असल्याचे स्पष्ट केले.
बदलत्या स्थितीचा फायदा घ्या
By admin | Published: May 17, 2015 1:29 AM